लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणावेळी वीरमरण, इन्फोसिसची नोकरी सोडली होती
सैन्यदलात लेफ्टनंट पदावर असलेल्या सांगलीच्या सुपुत्रास बिहार येथील प्रशिक्षणादरम्यान वीरमरण आले. लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार असे त्यांचे नाव असून वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयटी कंपनीतील नोकरी सोडून ते सैन्यदलात भरती झाले होते. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
सांगलीच्या पलूस गावचे अथर्व कुंभार यांची सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली होती. बिहार येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणादरम्यान 20 किमी रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असताना त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंडल, पलूससह अवघ्या पंचक्रोशीवर शोककळा पसरली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List