मल्टिवर्स – दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रवास

मल्टिवर्स – दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रवास

>> ड़ॉ स्ट्रेंज

मंगळ ग्रहावरील मोहिमेत ग्रहावर एकटेच पडण्याची वेळ आलेल्या मार्कच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा हा प्रवास. विज्ञान आणि मानव या भिन्न विश्वाचे एकमेकांशी जोडलेले स्तर यानिमित्ताने अनुभवता येतात.

एकटेपणा ही अत्यंत नकोशी अशी शिक्षा असते. मोजके लोक सोडले तर बहुतांश लोकांना एकटेपणा आवडत नाही. काही लोकांना तर एकटे राहण्याची भीतीदेखील वाटते. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर लोकांच्यात मिळून मिसळून राहायला आवडते. कोरोना काळात वाटय़ाला आलेला एकांतवास अनेकांना मानसिक आजार देऊन गेला होता. स्वतःच्या घरातला एकटेपणादेखील सहन न करू शकणाऱया आपल्यासारख्या एखाद्याला चक्क मंगळ ग्रहावर एकटे पडण्याची वेळ आली तर? अशा या एकटेपणाची आणि त्याच्यावर यशस्वीपणे मात करण्याची कथा म्हणजे `The Martian’ हा चित्रपट.

नासाच्या मंगळ ग्रहावरील मोहिमेने चित्रपटाची सुरुवात होते. मोहिमेतील सदस्य मंगळावरील मातीचे नमुने गोळा करत असताना अचानक धुळीचे मोठे वादळ येते आणि त्यांना आपल्या यानाकडे परतावे लागते. या सगळ्या गडबडीत मार्क हा अंतराळवीर वादळात सापडतो आणि त्याची इतर सदस्यांशी ताटातूट होते. नाहीसा झालेला मार्क मृत पावला आहे असे समजून सर्व सदस्य जड अंतःकरणाने परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र वादळ ओसरल्यावर मार्क जिवंत असल्याचे दिसून येते. काहीशा जखमी अवस्थेत असलेल्या मार्कला परिस्थितीची जाणीव होते आणि तो हादरून जातो.

भानावर आलेला मार्क आधी आपल्या जखमेवर उपचार करतो आणि मग शांत चित्ताने उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात करतो. पृथ्वीशी संपर्क साधता येईल अशी कोणतीही यंत्रणा मार्कजवळ नसते. मार्कला जर आता पृथ्वीवर परतायचे असेल तर एकमेव आशा म्हणजे नासाचे पुढले मिशन. नासा 500 दिवसांनी त्यांचे यान पुन्हा एकदा मंगळावर उतरवणार असतात. मात्र तेदेखील मार्कच्या सध्याच्या ठिकाणाहून 3200 किलोमीटर दूर उतरणार असते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो इतके दिवस तग धरण्याचा आणि त्यासाठी पुरेल इतक्या अन्नपाण्याच्या पुरवठय़ाचा.

मार्क आणि त्याच्या चमूने मंगळावर एक तात्पुरती प्रयोगशाळा आणि निवारा उभा केलेला असतो. वनस्पती शास्त्रज्ञ असलेला मार्क आता आपली बुद्धिमत्ता वापरून उपलब्ध यंत्रसामग्रीच्या मदतीने मंगळावर शेती करण्याचे ठरवतो. शेतीसाठी आवश्यक म्हणजे पाणी, पण मंगळावर पाणी नाही. त्यामुळे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मदतीने मार्क पाणी तयार करायचे ठरवतो आणि काही प्रयत्नांनंतर त्याला यशदेखील मिळते. उपलब्ध अन्नसाठय़ातील बटाटे मार्क शेतीसाठी वापरतो. इकडे उपग्रहाच्या मदतीने मंगळाच्या साईटवर लक्ष ठेवून असलेल्या नासाच्या शास्त्रज्ञांना मंगळावर असलेल्या त्यांच्या साईटवर होत असलेली यंत्राची हालचाल दिसते आणि मार्क जिवंत असल्याचे त्यांच्या लक्षात येते.

आता मार्कला परत आणण्याच्या हालचालींना सुरुवात होते. मात्र मार्कपर्यंत पोहोचण्यासाठी जितका कालावधी लागणार असतो तोवर मार्क जिवंत राहील का? हा खरा प्रश्न असतो. त्यामुळे मार्कच्या इतर साथीदारांना घेऊन पृथ्वीकडे परत येत असलेले यान पुन्हा मंगळाकडे वळवण्याचा निर्णय रद्द केला जातो. दुसरीकडे मंगळावरच्या एका जुन्या मोहिमेत वापरण्यात आलेल्या आणि मंगळावरच सोडून देण्यात आलेल्या पेलोडच्या मदतीने मार्क नासाशी संपर्क साधण्यात यश मिळवतो. कोडच्या माध्यमातून आता संदेशाची देवाणघेवाण सुरू होते.

नासा आता मार्कसाठी जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणि यंत्रसामग्री पोहोचवण्याचे ठरवते. मात्र या मोहिमेसाठीदेखील बराच काळ लागणार असतो. शेवटी घाईघाईत कोणतीही चाचणी न घेता एका यानात आवश्यक सामग्री घालून त्याचे उड्डाण केले जाते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच या यानाचा स्फोट होतो आणि नासाला अपयशाला सामोरे जावे लागते. इकडे प्रयोगशाळेत पोषक वातावरणाची निर्मिती करून शेतीचा केलेला यशस्वी प्रयोग एका मोठय़ा स्फोटात संपूर्ण नाश पावतो आणि मार्क पुन्हा एकदा निराश अवस्थेत जातो. मात्र स्वतःला सावरून मार्क ज्या कामासाठी नासाने त्यांना पाठवलेले असते त्या प्रयोगाच्या कामात स्वतःला जुंपून घेतो आणि नैराश्याला दूर करतो.

मार्कची दुर्दम्य इच्छाशक्ती त्याला पृथ्वीवर परत आणते का? त्यासाठी काय अनोख्या उपाययोजना राबविल्या जातात? विज्ञानाचे कोणते अनोखे नियम यासाठी मदत करतात? हे सर्व पडद्यावर पाहण्यात आणि मार्कचा प्रवास अनुभवण्यात एक न्यारीच रंगत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
तुम्ही सोशल मीडिया आणि अनेक सेलिब्रिटींना असे म्हणताना ऐकले असेल की रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते....
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या
केरळच्या मुख्यमंत्री निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी, पोलीस अलर्ट मोडवर