साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 जुलै ते शनिवार 19 जुलै 2025

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 जुलै ते शनिवार 19 जुलै 2025

>> निलिमा प्रधान 

मेष- क्षुल्लक तणाव जाणवेल
मेषेच्या सुखेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. तुमच्या क्षेत्रात काम करताना तुम्ही घेतलेला निर्णय हाच शेवटचा आहे असे मत व्यक्त करण्याची घाई करू नका. सहकारी वर्गाचे ऐकून घ्या. नोकरीत क्षुल्लक तणाव जाणवेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपयशाचे खापर तुमच्यावर फोडण्याचा प्रयत्न होईल.
शुभ दि. 13, 14

वृषभ- रागावर नियंत्रण ठेवा
वृषभेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडचणींवर मात करून यश मिळवाल. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होईल. कामाची प्रशंसा होईल. कर्जासंबंधी कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. मुद्दे प्रभावी ठरतील. वरिष्ठांना खूष कराल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. शुभ दि. 13, 16

मिथुन- परदेशगमनाची संधी
मिथुनेच्या धनेषात सूर्य, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. रेंगाळलेली कामे करण्याचा प्रयत्न करा. व्यसन, मोह यापासून मनस्ताप होईल. नोकरीत वर्चस्व लाभेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात लक्ष द्या. कोणत्याही कामासाठी दुसऱयावर विसंबून राहू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. ज्ञानात भर पडेल.
शुभ दि. 14, 16

कर्क- अहंकार दूर ठेवा
स्वराशीत सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला निर्णयाची घाई नको. अहंकार नको. कायदा सर्वत्र पाळा. धंद्यातील गुंता सोडवता येईल. मात्र जास्त अपेक्षा ठेऊ नका. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेते सहाय्यक ठरतील. वरिष्ठांना दुखवू नका. भलत्या व्यक्तीच्या सल्ल्याने मोठा निर्णय ठरवू नका.
शुभ दि. 17, 18

सिंह- तडजोड स्वीकारा
सिंहेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र शुक्र युती. अतिआत्मविश्वास, उत्साह यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेताना सावध रहा. कुणालाही कमी लेखू नका. घराची वृद्धाची काळजी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी अहंकार नको. सर्वत्र कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर दबाव आहे याची जाणीव होईल. तडजोड स्विकारावी लागेल.
शुभ दि. 14, 15

कन्या- गुणांची पारख होईल
कन्येच्या एकादशात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. रागाचा पारा वाढू देऊ नका. सर्व कामे वेगाने पूर्ण करता येतील. चातुर्य, गोड बोलणे यामुळे संबंध अधिक सुधारतील. नोकरीमध्ये गुणांची पारख होईल. कौतुक होईल. चांगला बदल शक्य होईल. धंद्यात वाढ होईल. नविन परिचयातून लाभ, उत्साह मिळेल. कला, क्रिडा, साहित्यात प्रेरणा मिळेल.
शुभ दि. 13, 16

तूळ- कामाचा व्याप राहील
तुळेच्या दशमेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. जवळच्या व्यक्ती मनस्ताप देतील. नोकरीमध्ये कामाचा व्याप राहील. वर्चस्व वाढेल. धंद्यात वाढ होईल. फसगत टाळा. तुमच्या भावनांची कदर होणार नाही. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांनी त्रस्त व्हाल. वरिष्ठ तुमच्या बाजुने असतील. खचून न जाता कामे करा. शुभ दि. 14, 18

वृश्चिक- आळस करू नका
वृश्चिकेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. अडचणीतून यश मिळवावे लागेल. आळस करू नका. नोकरीमध्ये प्रभाव राहील. धंद्यात चर्चेत यश लाभेल. नवे काम शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आर्थिक साहाय्य घेताना नीट विचार करा. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. योग्य व्यक्तीची निवड करा.
शुभ दि. 16, 17

धनु- व्यवहारात नुकसान टाळा
धनुच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. प्रकृतीची काळजी घ्या. मैत्रीत, नात्यात गैरसमज येतील. व्यवहारात नुकसान टाळा. नोकरीमध्ये तणाव राहील. वाद जाणवेल. धंद्यात धावपळ होईल. अडचणींवर जिद्दीने मात कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. तणाव जाणवेल. चौफेर नजर ठेवा.
शुभ दि. 13, 14

मकर- दुखापत टाळा
मकरेच्या सप्तमेषात सूर्य, बुध शुक्र लाभयोग. वाहनाचा वेग कमी ठेवा. दुखापत टाळा. नोकरीतील समस्या सोडवता येतील. धंद्यात हुशारी ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, चिंता कमी होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. चर्चा, कला, साहित्यात कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
शुभ दि. 15, 16

कुंभ- धंद्यात वाद नको
कुंभेच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र गुरू लाभयोग. क्षुल्लक चुका, अहंकार यामुळे कामात व्यत्यय येईल. प्रत्येक दिवस तुम्ही यशस्वी करू शकता पण तत्त्व लक्षात ठेवा. नोकरीत वरिष्ठांशी भाष्य करताना चूक नको. धंद्यात वाद नको. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांच्या विचारांचा अभ्यास करा. स्वतचे मत मांडण्याची घाई नको. शुभ दि. 14, 15

मीन- कुणालाही कमी लेखू नका
मीनेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र शुक्र लाभयोग. कुणालाही कमी लेखू नका. विरोधक मैत्रीची भाषा करतील. नोकरीत कामात लक्ष द्या. संघर्ष टाळा. धंद्यात नवे धोरण आणण्याची घाई नको. आळस नको. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या लोकांचे चांगले सहकार्य मिळेलपण अतिविश्वास ठेवू नका. गुप्त कारवाया वाढतील. शुभ दि. 18, 19

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात
अनेकदा आपण आणलेली औषधे आजार बरा झाल्यानंतर वापरली जात नाहीत आणि वर्षानुवर्षे घरातच पडून राहतात. सहसा अशी औषधे कचऱ्याच्या डब्यात...
रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या