सत्ताधारी मूर्ख आहेत, यांनी मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलंय, संजय राऊत यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ”सत्ताधारी मुर्ख लोकं आहेत, त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? त्यांनी मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला.
दै. सामनाच्या आता संभ्रम नको! गुंड टोळ्या, राजकीय खोजे काय करणार? या रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दावरून भाजप राईचा पर्वत करत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”हे जर शिकलेले लोकं असतील तर त्यांना माहित असेल की मी आधी देखील हा शब्द वापरलेला आहे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. काही गुजरातचे धनिक शेठ हे मुंबईला आपलं बटिक बनवू इच्छितात. सत्ताधाऱ्यांनी त्या परिस्थितीवर बोलावं. धारावीच्या निमित्ताने अदानीला जी भूखंडाची आंघोळ घातली जातेय त्यावर बोला. मराठी माणसाला हद्दपार केलं जातंय त्यावर बोला. ते बोललं जात नाही ना याचा अर्थ मुंबई तुमची बटिक आहे. मुंबईचा उल्लेख या आधी देखील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी ‘दिल्लीची तजेलदार वेश्या’ असा केला आहे. त्यातून हे आंदोलन झालं. जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास शिका. शब्द, वाक्य संस्कृती आम्हाला शिकवू नका. हे सगळे दिल्लीचे रंडके आहेत. त्यांनी आम्हाला शब्द शिकवू नका. मुंबई लुटली जातेय, मराठी माणासाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List