काम सुरू झाल्याने खासदार लंके यांचे उपोषण मागे, प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

काम सुरू झाल्याने खासदार लंके यांचे उपोषण मागे, प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने तसेच हे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंदरकर यांच्या वतीने देण्यात आल्याने खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आंदोलन आज सायंकाळी मागे घेतले.

खासदार लंके यांना देण्यात आलेल्या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे की, या रस्त्याच्या ठेकेदाराला काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ठेकेदाराने शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे काम, शनिशिंगणापूर फाटा येथे मिलिंगचे काम तसेच मौजे देहरे येथे अंडरबायपासचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मौजे कणगर आणि मौजे पिंपरी निर्मळ येथे प्लॅन्ट उभारणी आणि यंत्रसामग्री व लॅबोरेटरी उभारण्यात आली असल्याचे या लेखी आश्वासनात नमूद केले आहे.

लंके यांच्या सहकाऱ्यांनी केली कामाची पडताळणी

दरम्यान, नीलेश लंके हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शुक्रवारी सायंकाळी प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ठेकेदारास शनिवारी काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासून लंके यांच्या सहकाऱ्यांनी या रस्त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले किंवा नाही, याची पडताळणी केली. सहकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर लंके यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यास मान्यता दर्शविली.

तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

या प्रकल्पाचे काम सातत्याने सुरू राहील व विहित वेळेत पूर्ण केले जाईल, असे प्रकल्प ठेकेदाराने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयास आश्वासित केले आहे. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर नियमोचित दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे.

ठेकेदारास मुदतवाढ नाही!

ठेकेदाराने काम सुरू करून कालबद्ध वेळेत पूर्ण करून देण्याचे आश्वासन सुरुवातीस देण्यात आले होते. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही, याचा समावेश लेखी आश्वासनात हवा, अशी मागणी खासदार लंके यांनी यावेळी केली. त्यानंतर आश्वासनात ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही, याचा उल्लेख त्यात करण्यात आला.

खासदार वाघचौरे यांचा पाठिंबा

खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी खासदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क करून, या प्रश्नावर मी तुमच्यासोबत आहे. दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीमुळे आपण दिल्लीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितल्याचे लंके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;