Delhi Hit And Run – भरधाव ऑडिने पाच जणांना चिरडले, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला अटक
दिल्लीतील वसंत विहार भागात एका मद्यधुंद चालकाने त्यांच्या ऑडि कारने फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. जखमींमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीचा समावेश असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी उत्सव शेखर या चालकाला अटक केली आहे.
राजस्थानमधून रोजगारासाठी लाधी यांचे कुटुंब हे दिल्लीत आले होते. ते मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. राहायला घर नसल्याने फुट पाथवर सध्या ते राहत होते. नेहमी प्रमाणे ते फुटपाथवर झोपलेले असताना एक भरधाव ऑडि त्यांच्या दिशेने आली व तिने तिथे झोपलेल्या पाचही जणांना चिरडले. या अपघातात लाधी (40), सबमी (45), नारायणी (35), राम चंदर आणि बिमला (8) हे जखमी झाले. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र यातील बिमलाची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातानंतर आरोपीला लगेच अटक करण्यात आली. पोलिसांवर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List