IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या लॉर्ड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना कडवी झुंज देत आहेत. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 387 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव सुद्धा 387 धावांवर आटोपला. दोन्ही संघांचा पहिला डाव समान धावसंख्येवर येऊन थांबल्याने हा एक दुर्मिळ योगायोग ठरला आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच हा योगायोग घडला आहे.
क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघाचा पहिला डाव समान धावसंख्येवर समाप्त होण्याची ही केवळ नववी वेळ ठरली आहे. पहिल्यांदा 1910 साली डरबनमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी 199 धावा केल्या होत्या. त्यानंतर 1958 साली कानपूमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी 222 धावा, 1973 साली न्यूझीलंड आणि पाकिस्तानने 402 धावा, त्याचवर्षी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी 428 या समान धावा केल्या होत्या. त्यानंतर 1986 साली टीम इंडिया आणि इंग्लंडने 390 धावा, 1994 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने सर्वाधिक समान धावांचा डोंगर उभा केला होता. दोन्ही संघांनी आपापल्या डावात 593 धावा केल्या होत्या. 2003 साली वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाने 240 धावा, 2015 साली इंग्लंड आणि न्यूझीलंडने 350 धावा केल्या होत्या. आता 10 वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडिया आणि इंग्लंडने आपापल्या डावात 387 धावा केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List