लग्नासाठी शेवगावातील तरुणीवर आळंदीत अत्याचार, महिलेसह पाचजणांविरुद्ध शेवगावात गुन्हा
शेवगाव तालुक्यातील एका 19 वर्षीय तरुणीला फसवून जबरदस्तीने आळंदी येथे नेत लग्नाची मागणी करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह पाचजणांविरुद्ध शेकगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगकान आंधळे (रा. आळंदी) आणि गाडीचालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत तरुणीने फिर्याद दिली आहे. 2 ते 3 जूनदरम्यान आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी तरुणी आणि आरोपी अण्णासाहेब यांचे कौटुंबिक संबंध आहेत. 2 जून रोजी सायंकाळी तरुणी घरी एकटी असताना, तिच्या ओळखीच्या महिलेने ‘शेतावर जाऊ या’ असे सांगत तिला गावाबाहेर नेले. वाटेत इर्टिगा गाडी थांबवण्यात आली. त्यामध्ये अण्णासाहेब, प्रवीण आणि अन्य एकजण होते. या तिघांनी पीडितेला जबरदस्तीने धमकावत गाडीत बसवून आळंदी येथे नेले. तेथे सुनीता व अभिमन्यू आंधळे यांच्या राहत्या घरी तिला ठेवले. तेथे अण्णासाहेबने तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संधी साधून तरुणीने मोबाईलवरून पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्यानंतर आळंदी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पीडितेला तिच्या घरी आणण्यात आले. मात्र, भीतीपोटी ती काही दिवस गप्प राहिली. अखेर 7 जुलै रोजी तिने वडिलांना सर्व प्रकार सांगितला आणि त्यांच्यासह शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List