Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या
जुन्या वादातून दारुच्या नशेत दोन भावांनीच भावाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना वडाळा येथे उघडकीस आली आहे. निखिल सकाराम लोणडे असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. कल्पेश कुडतरकर आणि योगेश कुडतरकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निखिल आणि दोन्ही आरोपींचा याआधीही अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होते. या घटनेमुळे वडाळा परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर दोन तासात पोलिसांनी आरोपींचा शोध बेड्या ठोकल्या. ही हत्या केवळ जुन्या वादातून झाली की यामागे अन्य काही कारण होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. हत्येत वापरलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List