दिलीप वेंगसरकर कुठाय?

दिलीप वेंगसरकर कुठाय?

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसापासून स्टार स्पोर्ट्स आणि जिओ-हॉटस्टारवर ‘लेजेंड्स आर मेड इन इंग्लंड’ ही चित्रफीत दाखवली जात आहे. आख्यायिका इंग्लंडमध्ये बनतात असं सांगणाऱ्या चित्रफितीमध्ये अगदी 1979 पासूनचे फलंदाज अन् त्यांचं कर्तृत्व मोठ्याच कौतुकाने दाखवलं जात आहे. गावसकर, तेंडुलकर, कपिल, विराट अशा अनेकानेक महान खेळाडूंच्या आख्यायिका पाहायला खूप मजा येतेय!

पण एक गोष्ट मात्र खटकली. या सर्व खुमासदार आख्यायिकांमध्ये आकर्षक फलंदाजी करणाऱ्या दिलीप वेंगसरकरचा समावेश नाहीये! त्याच दिमाखदार दिलीपची ही वाङ्मयीन आख्यायिका! वेंगसरकरने 1979 (103), 1982 (157) आणि 1986 (126*) अशा लागोपाठच्या इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्सवर शतकांची झालर विणली होती. असा आजपर्यंत अबाधित असणारा पराक्रम करणारा तो एकमेव परदेशी फलंदाज आहे!

1986च्या लॉर्ड्स कसोटीत मिळालेल्या विजयात दिलीपच्या शतकाचा सिंहाचा वाट होता! लॉर्ड्सच्या मैदानावर दिलीपने 72.57 च्या सरासरीने 508 धावा दणकावल्या आहेत. 1995 साली जेव्हा आम्ही मुंबईच्या एकवीस पत्रकारांनी लॉर्ड्सच्या संग्रहालयाला भेट दिली तेव्हा बरोबर इंग्लंडचे कसोटीवीर रमण सुब्बाराव होते. आमचा फोटो काढताना ते म्हणाले होते, ‘डोन्ट से चीज, से वेंगसरकर’. दिलीप वेंगसरकर दादा फलंदाज होता. कदाचित, पुढच्या लॉर्ड्सच्या कसोटीदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या चित्रफितीमध्ये दिलीपला मानवंदना देण्यात येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधारकार्ड हरवले तर? परत मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स आधारकार्ड हरवले तर? परत मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
आधारकार्ड आता सरकारी कामासोबत खासगी कामासाठीसुद्धा खूपच आवश्यक झाले आहे. आधारकार्ड हरवले तर काय करावे हे अनेकांना कळत नाही. त्यांच्यासाठी...
Pune news – कुरिअर बॉय नव्हे; तरुणीनेच रचला बनाव, दिशाभूल केल्याने तब्बल 600 पोलीस लागले कामाला
दरवर्षी 3 ऑक्टोबरला ‘अभिजात मराठी भाषा दिवस’; आठवडाभर व्याख्याने, प्रदर्शने, विविध स्पर्धांचे नियोजन
BJP Leader Shot Dead – भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, घराबाहेर हल्लेखोरांनी एकटं गाठलं अन्…
मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा! उद्योजक सुशील केडियाची मुजोरी
हिंदी सक्तीविरोधातील शेकडो आंदोलनकर्त्यांवर गुन्हे! सरकारकडून आकसाने कारवाई
शालेय शिक्षणाची अवनती, जाधव समिती रद्द करा; मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीची मागणी