टोमॅटोपासून ब्रोकोलीपर्यंत… चमकदार त्वचेसाठी ‘हे’ 5 पदार्थांचे आहारात करा समावेश

टोमॅटोपासून ब्रोकोलीपर्यंत… चमकदार त्वचेसाठी ‘हे’ 5 पदार्थांचे आहारात करा समावेश

आपण प्रत्येकजण चमकदार त्वचा मिळवण्यासाठी त्याचबरोबर मऊ त्वचेसाठी अनेक स्किन केअर तसेच घरगूती उपायांचा वापर करत असतो. पण त्वचा असो किंवा शरीर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्वचा निरोगी राहावी यासाठी त्वचेकरिता काय वापरतो यापेक्षा आपण आपल्या आहारात काय सेवन करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुमचा आहार योग्य असेल आणि तुम्ही फळे आणि घरी बनवलेले पदार्थ खात असाल तर तुमची त्वचा निरोगी राहते. हेल्थलाइनच्या मते, जर तुम्ही निरोगी पदार्थांचे सेवन केले तर ते तुम्हाला वृद्धत्वविरोधी समस्येपासून आराम देईल.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले काही पदार्थ कोलेजन वाढवण्यास आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे हे आजच्या या लेखातून जाणून घेऊयात…

तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी तुमच्या आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा

ब्रोकोली त्वचेसाठी फायदेशीर आहे

ब्रोकोली त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हेल्थलाइनच्या मते, ब्रोकोलीमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच त्यात झिंक, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील असते जे त्वचेतील कोलेजन वाढवते आणि त्वचा निरोगी बनवते. यासोबतच ब्रोकोलीमध्ये ल्युटीन देखील असते जे कॅरोटीनॉइड आहे आणि ते बीटा कॅरोटीनसारखे काम करते. ल्युटीन त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवते.

टोमॅटो त्वचा मऊ बनवतो

टोमॅटो हे प्रत्येक पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात वापर केला जातो. कारण यात व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. बीटा कॅरोटीन, लायकोपीन, ल्युटीन असते जे त्वचेला सूर्याच्या किरणांपासुन संरक्षण करते आणि त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर करते.

डार्क चॉकलेटचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत

डार्क चॉकलेट त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करते. हेल्थलाइनच्या मते, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की 6 ते 12 आठवडे डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि सनबर्नची समस्या कमी होते.

पपई फायदेशीर आहे

पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात. 2014 च्या एका अभ्यासात असे आढळून आले की पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

रताळं त्वचेला चमक देते

त्वचा चमकदार करण्यासाठी रताळे खावेत. हेल्थलाइनच्या मते, त्यात बीटा कॅरोटीन नावाचे पोषक तत्व असते जे प्रो व्हिटॅमिन ए सारखे काम करते आणि शरीरात त्याचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते. त्यात बीटा कॅरोटीनसारखे कॅरोटीनॉइड असतात जे त्वचेला निरोगी बनवतात तसेच उन्हापासून वाचवतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती