विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू, जामखेडमध्ये आठवड्यातील तिसरी घटना

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू, जामखेडमध्ये आठवड्यातील तिसरी घटना

क्रिकेट खेळताना स्लॅबवर गेलेला बॉल फ्लेक्सच्या लोखंडी पाइपने काढत असताना मुख्य वीजवाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील खर्डा चौकाजवळील टेकाळेनगर या ठिकाणी घडली. विजेच्या तारांना चिकटून मृत्यू झाल्याची आठ दिवसांतील तिसरी घटना आहे. प्रणव प्रशांत टेकाळे (वय 12, रा. टेकाळेनगर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळेनगर येथे आज सायंकाळी प्रणव टेकाळे मित्रांसोबत घराजवळ क्रिकेट खेळत होता. खेळताना बॉल स्लॅबवर गेला. जवळच मुख्य विजेच्या तारा होत्या. प्रणव फ्लेक्सच्या लोखंडी पाइपने बॉल काढत असताना लाइटच्या तारांना धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वीच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेतात पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महिला वायरमनला दोषी ठरवून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महावितरण अनभिज्ञ!

दरम्यान, शहरातील सदाफुलेवस्ती येथील टेकाळेनगर येथे विजेचा धक्का लागून बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती शहरात पसरली. मात्र, महावितरणच्या अधिकाऱयांना काहीही माहीत नव्हते. घटनेनंतर तीन तास झाले, तरीही महावितरणचा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता.

Child Dies of Electric Shock in Jamkhed; Third Incident This Week

A child tragically died of an electric shock in Jamkhed, marking the third such incident in the area within a week. Authorities urged urgent safety measures.

keyword: Jamkhed electric shock, child dies electric shock, Jamkhed accident news, third electric shock case, child death Maharashtra, Jamkhed news today, electricity safety

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
आपल्या भारतीय स्वयंपाकघरात जेवण बनवताना अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. हे मसाले केवळ जेवणाची चव वाढवतातच असे नाही तर आपल्या...
Kiss करण्याचेही असतात दुष्परिणाम ?, 5 मिनिटांत शरीरात काय बदल होतो ?
Video – शेतकऱ्यांच्या नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? – अंबादास दानवे
Thane News – आमच्यासाठी बस का नाही? शहापूरकडे जाणारी एसटी रोखून धरत विद्यार्थ्यांचे आंदोलन
बस कर पगली! इतका भंपकपणा बरा नव्हे, रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघ यांना सणसणीत टोला
Photo – ‘अप्सरेला’ भिजवून गेला वारा…
उत्तराखंड, हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 200 हून अधिक पर्यटक अडकले