अमेरिकेचा पुन्हा टेरीफबॉम्ब, रशियाकडून तेल घ्याल तर 500 टक्के आयातशुल्क

अमेरिकेचा पुन्हा टेरीफबॉम्ब, रशियाकडून तेल घ्याल तर 500 टक्के आयातशुल्क

रशियाकडून तेल आयात करणाऱ्या आणि युद्धात युक्रेनला मदत न करणाऱ्या देशांवर तब्बल 500 टक्के आयातशुल्क लादण्यात येईल असा टेरीफबॉम्ब अमेरिकेचे सिनेटर ग्रॅहम लिंडसे यांनी टाकला आहे. रशियाकडून तब्बल 70 टक्के तेल विकत घेत असल्याने या टेरीफबॉम्बचा सर्वाधिक फटका चीन आणि हिंदुस्थानला बसणार आहे. हिंदुस्थान आणि चीनने सातत्याने रशियाला मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला मदत करण्याच्या दृष्टीने रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर अतिरिक्त आयातशुल्क लादण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने अशाप्रकारे टेरीफच्या नावाखाली अनेकदा हिंदुस्थानला धमकी दिल्याचे वारंवार समोर आले आहे. एका मुलाखतीत लिंडसे यांनी अमेरिकेची भूमिका मांडली. रशियाला उघडपणे समर्थन देणाऱ्या हिंदुस्थान आणि चीनला अमेरिकेच्या 500 टक्के टेरीफचा सामना करावा लागेल, असे ते म्हणाले.

रशियाची मदत करणाऱ्यांविरोधात विधेयक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाची मदत करणाया हिंदुस्थान आणि चीनविरोधात प्रतिबंधात्मक विधेयक तयार करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा लिंडसे यांनी केला आहे. आता हे विधेयक पुढे रेटण्याची वेळ आली असून या विधेयकात रशियासोबत व्यापार करणाऱ्यांविरोधात अतिरिक्त आयातशुल्क लादण्याची तरतूद करण्यात आल्याचेही लिंडसे यांनी म्हटले आहे.

रशियाला कमजोर करण्याचा प्रयत्न

रशिया आणि युव्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाला कमजोर करण्याचा अमेरिका प्रयत्न असल्याचे वारंवार समोर आले आहे. जे देश रशियाशी व्यापार करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिका सातत्याने करत आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या देशांवर तब्बल 500 टक्के टेरीफ लावण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. दरम्यान, चीन, हिंदुस्थान आणि इराणसारख्या देशांनी अमेरिकेच्या या धमकीकडे दुर्लक्ष केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement