150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती

150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती

ओडिशातील पुरी येथे 27 जूनपासून जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक रथयात्रेत सहभाग घेताना दिसत आहेत. जगन्नाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. रथयात्रेच्या निमित्ताने जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती चर्चेत आली आहे. मंदिराच्या संपत्तीचे अंदाजित मूल्य सुमारे 150 कोटी रुपये आहे. इतकेच नाही तर मंदिराकडे तब्बल 30,000 एकर जमीनही आहे, ज्यामुळे ते देशातील काही निवडक मंदिरांमध्ये सामील होते. या मंदिराची देखभाल ओडिशा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाद्वारे केली जाते. हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले आहे आणि ते चार धाम तीर्थस्थळांपैकी एक आहे. काही खास प्रसंगी भगवान जगन्नाथांच्या मूर्तीला 209 किलो सोन्याने सजवले जाते, जे मंदिराची भव्यता आणखी वाढवते.

रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर रत्न भांडाराची डागडुजीचे काम पूर्ण करण्यास श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने पुरातत्त्व खात्याला विनंती केली होती. कारण या कार्यशाळा देव मंदिराबाहेर असतात. तसे पत्र पुरातत्व खात्याला देण्यात आले होते. गेल्या वर्षीही रथयात्रेदरम्यानच मंदिराचे रत्नभांडार खुले करण्यात आले होते.

46 वर्षांनंतर उघडले ‘रत्न भांडार’

मंदिराच्या आत असलेले ‘रत्न भांडार’ तब्बल 46 वर्षांनंतर 18 जुलै 2024 रोजी उघडण्यात आले होते. सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी भरलेल्या या खजिन्याची सुरुवातीची अंदाजित किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. 18 जुलै 2024 रोजी सकाळी 11 सदस्यांच्या एका समितीने हे रत्न भंडार उघडले. आतमध्ये तीन जाड काचेचे कपाटे, एक मोठे लोखंडी कपाट आणि सोन्याने भरलेल्या अनेक पेट्या सापडल्या. या पेट्या इतक्या जड होत्या की त्यांना जागेवरून हलवणेही शक्य नव्हते. त्यामुळे टीमने 7 तासांनंतर हलवल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement