Home Decoration – घरामध्ये ही झाडे ठेवा आणि निरोगी राहा!

Home Decoration – घरामध्ये ही झाडे ठेवा आणि निरोगी राहा!

जागेअभावी आपल्याला झाडांची हौस पूर्ण करता येत नाही. परंतु आपण घरात झाडे लावून आपल्या घराची मात्र शोभा वाढवु शकतो. बाग करण्यासाठी जागा नसल्यावर खट्टू होऊ नका. आता घरात झाडे लावून तुमची झाडे लावण्याची हौस पूर्ण करा. घरातील हवा शुद्ध आणि खेळती राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर, घरामध्येही आपण काही महत्त्वाची झाडे लावू शकतो. हवा शुद्ध ठेवण्यासाठी काही झाडे ही खूप उत्तम मानली जातात.

बाहेर असणाऱ्या प्रदूषणामुळे, आपल्याला मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे. अशावेळी आपण घरातच आरोग्यसाठी उपयुक्त झाडे लावणे हे गरजेचे आहे.

सध्याच्या घडीला आपण ग्लोबल वाॅर्मिंगच्या महाभयानक समस्यांना सामोरे जात आहोत. अशा वातावरणात स्वच्छ, शुद्ध हवा मिळणे हे खूपच गरजेचे आहे. या अशा वातावरणात काही झाडे आपण घरात लावल्यासही आपल्या आरोग्यावर या झाडांचा उत्तम परीणाम होऊ शकतो.

जेड प्लांट

सध्याच्या घडीला हे झाड घरामध्ये आणण्याची खूप चलती आहे. जेड प्लांटमुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. या झाडामुळे वातावरणातील हवा शुद्ध होते. तसेच या झाडामुळे आपल्यातील तणाव पूर्ण होण्यास मदत होते. या झाडामध्ये पर्यावरणाच्या तसेच औषधाच्या दृष्टीने उत्तम गुणधर्म आहेत. घराच्या सजावटीमध्येही या झाडाचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. उत्तम झोप येण्यासाठी हे झाड घरात असणे खूपच गरजेचे झालेले आहे.

पीस लिली

पीस लिली या झाडाला फार देखरेख करावी लागत नाही. त्यामुळे या झाडाला तुम्हाला रोज पाणी घालण्याची गरज नाही. या झाडाला दिवसातून दोन तास सुर्यप्रकाश मिळाला तरी चालण्यासारखे आहे. घरातील ओलावा हे झाड शोषून घेते. तसेच शुद्ध हवा या झाडामार्फत आपल्याला मिळते. शांत झोपेसाठी हे झाड आपल्या बेडरुममध्ये लावल्यास अधिक उत्तम. मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हे झाड सर्वात महत्त्वाचे मानले जाते.

एरिका पाम

एरिका पाम हे झाड दिसायला सुंदर दिसत असल्यामुळे आपल्या घराची शोभा वाढण्यास मदत होते. तसेच या झाडामुळे घरातील धूळ कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. या झाडामुळे आॅक्सिजन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. एरिका पाम हे झाड हवेतील विषारी पदार्थ शोषून घेण्यास मदत करते. घरामध्ये हे झाड लावल्यास डोळ्यांची खाज तसेच घशातील खरखर कमी होण्यास मदत होते.

मनी प्लांट 

या झाडाच्या नावातच खूप काही आलं. हे झाड समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच घरात झाड लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. मनी प्लांट कार्बन मोनोआक्साइड सारख्या अपायकारक घटकांना हवेतून शोषून घेतो. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. नकारात्मक उर्जेवर हे झाड हमखास उपाय मानले जाते. मनी प्लांटमुळे घरात शांती आणि समृद्धी नांदते.

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट हे झाड हवेच्या शुद्धीसाठी एकदम अचूक पर्याय मानला जातो. एलर्जी पासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे झाड बहुमोली आहे. कमी प्रकाशात हे झाड येत असल्यामुळे, हे घरामध्ये लावण्यासाठी सर्वात उत्तम झाड आहे. मुख्य म्हणजे वातावरणातील हवा शुद्ध करण्यासाठी हे झाड उत्तम आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
आपल्या भारतीय स्वयंपाकघरात जेवण बनवताना अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. हे मसाले केवळ जेवणाची चव वाढवतातच असे नाही तर आपल्या...
Kiss करण्याचेही असतात दुष्परिणाम ?, 5 मिनिटांत शरीरात काय बदल होतो ?
Video – शेतकऱ्यांच्या नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? – अंबादास दानवे
Thane News – आमच्यासाठी बस का नाही? शहापूरकडे जाणारी एसटी रोखून धरत विद्यार्थ्यांचे आंदोलन
बस कर पगली! इतका भंपकपणा बरा नव्हे, रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघ यांना सणसणीत टोला
Photo – ‘अप्सरेला’ भिजवून गेला वारा…
उत्तराखंड, हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 200 हून अधिक पर्यटक अडकले