Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..

भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात. त्यांच्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत, जे रोगांना मुळापासून नष्ट करण्याचे काम करतात. आरोग्य शिक्षक प्रशांत देसाई यांनी सांगितले की, तुमच्या स्वयंपाकघरात औषधाच्या पेटीपेक्षा जास्त शक्तिशाली औषधे आहेत. आजारांशी लढण्याचा हा पहिला मार्ग आहे, जो आजींच्या काळापासून चालू आहे. पीसीओएसपासून ते बॅक्टेरिया नष्ट करण्यापर्यंत त्यांचे अनेक फायदे आहेत. त्यांनी मसाल्याच्या पेटीत ठेवलेल्या 3 मसाल्यांविषयी सांगितले आहे ते चला जाणून घेऊयात.

मेथी दाणे – मधुमेह आणि कोलेस्टेरॉल दोन्ही एकत्रितपणे त्रास निर्माण करतात. कोलेस्टेरॉलमुळे मधुमेहाच्या रुग्णांची प्रकृती बिघडू शकते. यासाठी तज्ज्ञांनी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला आहे . त्यामुळे टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉल प्रोफाइल सुधारते. जगभरातील लाखो लोक या दोन्ही आजारांनी त्रस्त आहेत.

असंतुलित हार्मोन्स – महिलांमध्ये PCOS आणि PCOD वाढत आहेत. हे त्यांच्या हार्मोन्समधील असंतुलनामुळे आहे. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण दालचिनी यामध्ये फायदेशीर आहे. ती हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते.

लवंग – लवंग तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो . बॅक्टेरिया, बुरशी आणि विषाणूंमुळे अनेक आजार होऊ शकतात. पण तज्ञांच्या मते, लवंग तेलात हे सर्व सूक्ष्मजंतू मारण्याची शक्ती आहे.

पचन सुधारते – मसाल्यांमध्ये पचन सुधारण्याची क्षमता असते. म्हणून, ते अन्नासोबत घेतले जातात जेणेकरून अन्न सहज पचते. जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर योग्य मसाल्यांचा वापर करा.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…

मसाले खाल्ल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाहीत.

मसाल्यांचे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतीकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

तुम्हाला सर्दी, खोकला किंवा ताप यांच्या सारख्या समस्या होत असतील तर स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचा वापर केल्यास होतील फायदे.
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये अनियमित पाळीच्या समस्या उद्भवतात त्यांनी मसाल्यांच्या काढ्याचे सेवन करावे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित आरोग्याच्या ‘या’ पाच कारणांसाठी तुम्ही दररोज प्या दालचिनीचे पाणी, फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
आपल्या भारतीय स्वयंपाकघरात जेवण बनवताना अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. हे मसाले केवळ जेवणाची चव वाढवतातच असे नाही तर आपल्या...
Kiss करण्याचेही असतात दुष्परिणाम ?, 5 मिनिटांत शरीरात काय बदल होतो ?
Video – शेतकऱ्यांच्या नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? – अंबादास दानवे
Thane News – आमच्यासाठी बस का नाही? शहापूरकडे जाणारी एसटी रोखून धरत विद्यार्थ्यांचे आंदोलन
बस कर पगली! इतका भंपकपणा बरा नव्हे, रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघ यांना सणसणीत टोला
Photo – ‘अप्सरेला’ भिजवून गेला वारा…
उत्तराखंड, हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील 200 हून अधिक पर्यटक अडकले