Jammu Kashmir – राजौरीमध्ये जैशच्या दहशतवाद्याचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, हिंदुस्थानी लष्कराने केली अटक

Jammu Kashmir – राजौरीमध्ये जैशच्या दहशतवाद्याचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, हिंदुस्थानी लष्कराने केली अटक

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेवर (एलओसी) रविवारी (29 जून) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हिंदुस्थानी लष्कराने उधळून लावला. यादरम्यान एका पाकिस्तानी गाईडला अटक करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले. लष्कराने म्हटले आहे की, ‘सैनिकांनी केलेल्या निर्णायक कारवाईनंतर, एका प्रमुख मार्गदर्शकाला अटक करण्यात आली. यामुळे घुसखोरीचा प्रयत्न प्रभावीपणे हाणून पाडण्यात आला आणि घुसखोर दहशतवाद्यांना देखील यामध्ये दुखापत झाली.’

संरक्षण दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांना पाठवण्याचा प्रयत्न होत असल्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यानंतर सैन्याने बीएसएफच्या सहकार्याने कारवाई केली. सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 4-5 सशस्त्र दहशतवाद्यांच्या हालचाली पाहिल्या.’ या संयुक्त कारवाई दरम्यान, एका व्यक्तीला अटक करण्यात आली. घुसखोरीला मदत करणाऱ्या दहशतवाद्यांचा मार्गदर्शक म्हणून त्याची ओळख पटवण्यात आली. परंतु यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करताना जैशचे चार दहशतवादी जखमी झाले.

मार्गदर्शकाला अटक केल्यानंतर, सैन्याने परिसरात शोध मोहीम राबवली. या दरम्यान मोबाईल फोन आणि पाकिस्तानी चलनासह अनेक संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेला व्यक्ती नियंत्रण रेषेजवळील पीओकेचा रहिवासी होता. तो चौक्यांवर तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करत होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती