Monsoon session 2025 – महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर

Monsoon session 2025 – महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठी माणूस आणि एकजुटीमुळे सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांकडूीन विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर करण्यात आला.

‘हिंदीसक्ती’ शासन निर्णय सरकारने मागे घेतल्यावर, तमाम मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या मुजोरीला मराठी माणूस ऐकणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यामुळेच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेला जागर हा मराठी माणसाच्या एकजुटीचा जागर होता. आमदारांनी यावेळी ‘माघार सरकार, यू टर्न सरकार’, अशी घोषणाबाजी केली.

कोणाचीही समिती बसवली तरी महाराष्ट्रावर आता कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव, अनंत नर, सचिन अहीर, अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन 2025 च्या पहिल्या दिवशी विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि आशीर्वाद घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;