योगा केल्यानंतर आपल्या आहारात काय बदल करायला हवेत?

योगा केल्यानंतर आपल्या आहारात काय बदल करायला हवेत?

योगा केल्याने शरीरात अनेक चांगले बदल दिसून येतात. दिवसातून काही मिनिटेही योगा केला तर, आपल्या शरीराला त्याचे बरेच फायदे मिळतात. परंतु योगा करुन नुसते भागत नाही, तर आपल्या आहारामध्येही आपण बदल करणे गरजेचे आहे. योगा नंतर काय खावे? हे सर्वात महत्त्वाचे आता तुम्हाला जाणून घेता येणार आहे.

दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश योगाबद्दल जागरूकता निर्माण करणे हाच आहे. लाखो लोक या दिवशी योगाभ्यास सुरू करतात. पण बऱ्याचदा योगा केल्यानंतर योग्य आहार कोणता घ्यावा हेच आपल्याला माहीत नसते.

योगा केल्यानंतर हे पदार्थ खावेत.

योगा केल्यानंतर शरीराला ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन यांची गरज असते. ऑक्सिजनने समृद्ध अन्नपदार्थ म्हणजे हिरव्या भाज्या. शरीराच्या चयापचयासाठी हे खूप महत्वाचे आहे. कार्बनबद्दल बोलायचे झाल्यास, लोणी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यासोबतच तूप, तांदूळ, गहू, बटाटा, केळी इत्यादी. हायड्रोजनसाठी, कच्च्या भाज्या, पाणी आणि दूध यांचे सेवन खूप महत्वाचे आहे. नायट्रोजनसाठी, प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की दूध, दही, चीज, शेंगदाणे आणि मसूर खा. याशिवाय, योगा केल्यानंतर तुम्ही रसाळ फळे देखील खाऊ शकता.

योगानंतर काय खाऊ नये?

योगानंतर काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही खाऊ नयेत. जसे की तेल आणि मसालेदार अन्नपदार्थ. याशिवाय गोड आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ देखील टाळावे. योगा नंतर चहा किंवा कॉफी देखील पिऊ नये.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;