Mumbai Local News लोकलच्या प्रवाशांकडून M Indicator आणि QR कोडचा गैरवापर, टीसीपासून वाचण्यासाठी शक्कल

Mumbai Local News लोकलच्या प्रवाशांकडून M Indicator आणि QR कोडचा गैरवापर, टीसीपासून वाचण्यासाठी शक्कल

लोकलचे टाईमटेबल पाहण्यासाठी एम इंडिकेटर हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. एक कोटी पेक्षा जास्त युजरने हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून लाखो लोक हे अ‍ॅप वापरतात. या अ‍ॅप मध्ये ग्रुप चॅटिंगचीही सोय आहे. पण या ग्रुप चॅटिंगमध्ये एखाद्या ठिकाणी टीसी आहे अशी माहिती दिली जाते. त्यामुळे टीसी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडू शकत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक स्टेशन्सवर UTS अ‍ॅपवरून तिकीट काढण्यासाठी क्यु आर कोर्ड असतो. पण काही प्रवासी या क्यु आर कोडचा फोटो काढून कुठूनही तिकीट काढतात. यामुळेही विनातिकीट प्रवासी टीसीला पाहून दूरुनच तिकीट काढतात आणि दंड देण्यापासून वाचतात.

मुंबई मिररने या बाबत वृत्त दिले आहे. मुंबई लोकलमधून लाखो लोक प्रवासी करतात. अनेक प्रवासी विना तिकीट किंवा विना पास प्रवास करतात. लोकलने प्रवास करताना लाखो प्रवासी लोकलची वेळ कळावी म्हणून एम इंडिकेटर हे अ‍ॅप वापरतात. या अ‍ॅपमध्ये ग्रुप चॅटिंगची सोय आहे. कुठली गाडी कुठे आहे, गाड्या वेळेवर आहेत का, गाड्या रद्द तर झाल्या नाही ना याचे अपडेट्स प्रवासी एकमेकांना देत असतात. पण अनेक प्रवासी विशिष्ट ठिकाणी टीसी आहे याची माहिती देतात. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सतर्क होतात आणि दुसरकडून निघून जातात. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होतं. या बाबत एम इंडिकेटर अ‍ॅप चालवणारे सचिन टेके म्हणाले की अ‍ॅपमध्ये अश्लील आणि वादग्रस्त चॅट असेल तर ते हटवता येतात. प्रवासी एकमेकांना टीसीबाबत माहिती देत असतील त्यात काहीच करता येत नाही असे टेके म्हणाले.

QR Code चा गैरवापर

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने UTS अ‍ॅप बनवले आहे. या अ‍ॅपमधून प्रवशांना आपल्या मोबाईलमध्येच तिकीट किंवा पास काढता येतात. हे तिकीट प्रवासी स्टेशनवरूनही काढू शकता. त्यासाठी रेल्वेने स्टेशन्सवर क्यु आर कोड लावले आहेत. अनेक प्रवाशांनी या क्यु आर कोडचे फोटो काढून ठेवले आहेत. टीसी असल्याचे कळताच हे प्रवासी कुठल्याही स्थानकावरून तिकीत काढतात. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत नाही. अशा प्रकारे प्रवासी वर्षाकाठी 9 हजार रुपयांपर्यंत पैसे वाचवतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;