स्मशानभूमीच्या कामाचे बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली, ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

स्मशानभूमीच्या कामाचे बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली, ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

स्मशानभूमीच्या कामाचे बिल काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. विजयकुमार पंडितराव क्षीरसागर (53) असे लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांकडूनच ही लाच स्वीकारली.

भायगाव (वैजापूर) येथे जन सुविधा अंतर्गत स्मशानभूमीचे काम झाले होते. या कामाचे 6 लाख 96 हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते. हे काम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने केले होते. काम पूर्ण झाल्याची एनओसी उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल केली. बिलापैकी 94 हजार रुपये काढण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने 15 हजार रुपयांची मागणी केली. नावे चेकवर साइन करून देण्यासाठी ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने उपसरपंचाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संगीता पाटील, हवालदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, सी.एन. बागूल यांच्या पथकाने सापळा रचला. उपसरपंचांनी आरोपी ग्रामपंचायत अधिकारी क्षीरसागर यांस मोबाईलवर संपर्क करून कुठे भेटायचे, असे विचारले. त्याने जरुळ फाट्यावरील चैतन्य हॉटेलवर बोलावून घेतले. तेथे पंचासमक्ष 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना क्षीरसागर यास रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातील मोबाईल, रोख 700 रुपये, कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;