Misal Recipe – लय भारी कोल्हापुरी मिसळ बनवा घरच्या घरी!

Misal Recipe – लय भारी कोल्हापुरी मिसळ बनवा घरच्या घरी!

पावसाळा सुरु झाल्यावर काहीतरी झणझणीत चमचमीत खाण्याची इच्छा होते. बाहेर मस्त कोसळणारा पाऊस बघितल्यावर, आपल्या घरातही तसाच सुग्रास खमंग झणझणीत बेत व्हायलाच हवा. कोल्हापुरी झणझणीत मिसळ आणि पावसाळा हे समीकरण अगदी फक्कड आहे. म्हणूनच आता घरच्या घरी कोल्हापूरच्या तर्रीवाल्या मिसळ आस्वाद घेण्यासाठी तयार राहा.

मिसळ रेसिपी

साहित्य
मोड आलेली मटकी दोन वाट्या
सुके खोबरे- दीड वाटी किसून घेतलेले
आले- अर्धा इंच
लसूण- 7 ते 8 पाकळ्या
खसखस- 1 चमचा
काळी मिरी- 2 चमचे
धणे- 2 चमचे
कांदे- 3 मध्यम आकाराचे
टाॅमेटो- 2 मध्यम आकाराचे
तेल- 2 चमचे
गरम मसाला- 2 चमचा
घाटी मसाला- दीड चमचा
रंगासाठी कश्मिरी मिरची पावडर- 2 चमचा

कृती-
प्रथम आपण मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर ही मटकी चाळणीत काढून घ्यावी. चाळणीत मटकी उपसून पाणी निथळण्यासाठी ठेवावी.

कमी खर्चात चटपटीत पाणीपुरी करा घरच्या घरी, आता बाहेर जाण्याची गरज नाही!

एका कढईमधे थोडे तेल घालून त्यात सुके खोबरे, आले, लसूण पाकळ्या, तीळ, खसखस, हे सर्व भाजून बारीक वाटून घ्यावे. सुके खोबरे घातल्यास रश्श्याला तर्री मस्त येते.

सुके खोबरे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घालावा. हे कांदा खोबरे आणि टाॅमेटो थंड झाल्यावर, मिक्सरमधून फाइन पेस्ट करुन घ्यावे. मिसळसाठी लागणारा मसाला तयार.

एकीकडे कढईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, घालून फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे.

थोडा वेळ परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परतावे मग लसूण पाकळ्या, खोबरे आले, तीळ, खसखस, धणे, काळी मिरी हे सर्व बारीक केलेले मिश्रण घालून छान परतून घ्यावे मग त्यात मिक्सरमधून बारीक केलेला मसाला घालावा.

मिक्सरमधील मसाला तेलात घातल्यानंतर, त्याला चांगले परतून घ्यावे. या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतवावे. म्हणजे मिसळला रंग चांगला येईल. त्यानंतर त्यात मटकी घालून परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे.

सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे. मिसळ कधीही मंद आचेवर शिजवावी, म्हणजे त्याला चवही चांगली येते आणि वर मस्त कट येतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;