India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
हिंदुस्थान आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘ट्रुथ सोशल’ एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा दावा केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की हिंदुस्थान आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.”
बातमी अपडेट होत आहे…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List