काळजाचा ठोकाच चुकला… विराटला चेंडू लागताच अनुष्काचा जीव खालीवर
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या स्टार क्रिकेटर पती विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच मैदानावर हजर असते. शुक्रवारी (२३ मे) ती लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर दिसली. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात आरसीबीला ४२ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. पण सामन्यादरम्यान असा एक प्रसंग घडला की अनुष्का शर्मा खूपच घाबरली.
सोशल मीडियावर अनुष्काच्या भावना सर्वांना समजल्या
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि सनरायझर्स हैदराबाद या सामन्यातील अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे जेव्हा विराट कोहलीच्या हेल्मेटवर चेंडू लागला. ते पाहून अनुष्का शर्मा प्रचंड घाबरलेली दिसली. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जेव्हा चेंडू येऊन विराट कोहलीच्या हेल्मेटला लागला, तेव्हा अनुष्काची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. तिच्या चेहऱ्यावरून ती किती घाबरली होती हे स्पष्ट दिसत होते.
वाचा: पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक
सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही तिच्या चेहऱ्यावरील भावना लगेच ओळखल्या आणि त्याचे अनेक व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होऊ लागले. व्हायरल क्लिपमध्ये, चेंडू हेल्मेटवर लागताच अनुष्का खूपच अस्वस्थ झाल्याचे दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती दिसते. तसेच तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्टपणे दिसत होते. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने विराटच्या हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर अनुष्काची एक छायाचित्र शेअर केली आणि लिहिले, “विराट कोहलीच्या हेल्मेटवर चेंडू लागताच अनुष्का शर्मा घाबरली.”
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद
काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आणि अनुष्का वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. कोहलीने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाला १४ वर्षे झाली. या फॉरमॅटने माझी चाचणी घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या गोष्टी शिकवल्या. मैदानावर पांढरे कपडे घालून खेळणे नेहमीच खास होते. हा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण योग्य वाटते.”
अनुष्का शर्माच्या ‘चकदा एक्सप्रेस’ची प्रतीक्षा
अनुष्का शर्मा लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे, जो क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती सहा वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. ती शेवटची ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबत दिसली होती. ‘चकदा एक्सप्रेस’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, परंतु त्यांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List