Pune Highway Movie Review : मर्डर मिस्ट्रीचं तुफान म्हणजे ‘पुणे हायवे’, Amit Sadh अन् Jim Sarbh यांच्या कामाला सॅल्यूट!

Pune Highway Movie Review : मर्डर मिस्ट्रीचं तुफान म्हणजे ‘पुणे हायवे’, Amit Sadh अन् Jim Sarbh यांच्या कामाला सॅल्यूट!

Pune Highway Movie Review : भारतीय सिनेसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट येतात. मात्र काही मोजकेच चित्रपट असे असतात जे तुमच्या मनात काय घर करून राहतात. नुकताच प्रदर्शित झालेला पुणे हायवे हा मर्डर मिस्ट्री चित्रपटही असाच आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये पुणे हायवे हा सर्वाधिक सरस आहे, असे मानायला हककत नाही.

चित्रपटाची कथा काय आहे?

या चित्रपटाची कथा म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटात चार मित्र धाखवण्यात आले आहेत. यातील एकासोबत मारझोड होते. एकाला मारलं जात असताना बाकीचे तीन मित्र काहीही करू शकत नाहीत. ते फक्त उभे राहून पाहात राहातता. त्यानंतर अनेक वर्षांनंतर एक मृतदेह सापडतो. त्यानंतर आपापल्या आयुष्यात व्यग्र असणारे मित्र पुन्हा एकदा एकत्र येतात आणि नंतर चित्रपटाची खरी कहाणी चालू होते. सापडलेल्या मृतदेहाचं आणि एकत्र आलेल्या मित्रांचं काही कनेक्शन आहे का? असलंच तर या कनेक्शनचा नेमका काय संबंध आहे? या मित्रांचा भूतकाळ आणि सापडलेल्या मृतदेहाचा संबंध काय आहे? या प्रश्नांची उत्तर शोधणारा हा चित्रपट आहे. वरील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन एकतादरी पाहायला हवाच. तुम्हाला एका तगड्या मर्डर मिस्ट्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट चुकवू नये असाच आहे.

चित्रपट नेमका कसा आहे?

खरं सांगायचं झालं तर हा चित्रपट फार चांगला आहे. कारण चित्रपटातील सस्पेन्स शेवटपर्यंत टिकून राहतो. या चित्रपटात तुम्हाला हैराण करून टाकणाऱ्या घटना घडत राहतात. पहिल्याच सिनपासून चित्रपट वेग पकडतो आणि पुढे काय होईल? याची तुम्हाला उत्सुकता लागते. या चित्रपटात मुख्य पात्रांचा भूतकाळ आणि त्यांचं वर्तमान यांचा चांगल्या प्रकारे ताळमेळ घालण्यात आलेला आहे. या चित्रपटाचं कथानक चांगलंच वजनदार आहे. सोबतच या चित्रपटाची पटकथाही तेवढीत दमदार आहे. सर्वच कलाकारांनी चोख काम केलेलं आहे. चित्रपट पाहताना खरा गुन्हेगार कोण आहे? हत्या कोणी केली आहे? हे शेपटपर्यंत समजत नाही. हीच या चित्रपटाची विशेषता म्हणावी लागेल.

कलाकारांचा अभिनय कसा आहे?

अमित साध या अभिनेत्याने नेहमीप्रमाणे चोख काम केलं आहे. या चित्रपटातील काम पाहून तो एक मुरलेला अभिनेता आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय. अमित साधने या चित्रपटात केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्याने याआधी अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. या सर्वच भूमिकांना त्याने पूर्णपणे न्याय दिलेला आहे. पुणे हायवे या चित्रपटातही त्याने मिळालेली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. त्याच्या या कामाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. Jim sarbh यानंदेखील चांगलं काम केलं आहे. जीमने या चित्रपटात वकिलाची भूमिका केलेली आहे. त्याने वकिलाचं पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. Anuvab Pal यांचंही काम चांगलं आहे. मंजिरी फडणीस, केतकी नारायण यांनीदेखील चांगला अभिनय केलेला आहे. सुदीप मोदक याच्या पोलिसाच्या भूमिकेमुळे चित्रपटाला एक वेगळं वजन प्राप्त झालेलं आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन, लिखाण कसे आहे?

बग्स भार्गव कृष्णा आणि राहुल दा कुन्हा यांनी या चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन केलेले आहे. चांगले लिखाण झालेले असेल आणि त्याच प्रतीचे दिग्दर्शन झाले तर चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो, याचं उदाहरण या दोघांनीही घालून दिलंय. या दोघांनीही चित्रपटाला साधं ठेवण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटाची कथाच थेट भिडणारी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. या चित्रपटात प्रत्येक 10 मिनिटाला एक अचंबित करणारी बाब समोर येते. त्यामुळे हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहायलाच हवा.

सिनेमाचे नाव- पुणे हायवे
रेटिंग- 4 स्टार

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन देशांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत...
‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री
IPL 2025 – दिल्लीने शेवट गोड केला, पंजाबची दांडी केली गुल
फक्त ‘या’ दोन गोष्टींपासून बनवा होममेड काजळ, डोळ्यांना मिळतील फायदे
योग्य पत्ता न दिल्याने संतापला, झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Pahalgam Attack : ज्यांच्या कपाळाचं कुंकू हिसकावलं गेलं, त्या महिलांमध्ये योद्ध्याची भावना-उत्साह नव्हता; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य