नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
22 एप्रिल ही अशी तारीख आहे की या दिवसाने संपूर्ण भारताला हादरवलं. या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये करीयरला सुरुवात केली. यानंतर, 1999 मध्ये, कारगिल युद्धादरम्यान त्यांची भारतीय सैन्यात कॅप्टन पदासाठी निवड झाली.
बिक्रमजीत कंवरपाल यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, अभिनय करण्यापूर्वी, ते 1989 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले आणि 2002 मध्ये मेजर पदासाठी त्यांची निवड झाली. पण कोविड महामारीच्या काळात त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अच्युत पोतदार हे आमिर खानच्या 3 इडियट्स सिनेमासाठी ओळखले जातात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम करून देशाची सेवा केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List