सहकाऱ्याला वाचवताना स्वतः शहीद; लेफ्टनंट शशांक तिवारी यांना 23व्या वर्षी सिक्कीममध्ये वीरमरण
सिक्कीममध्ये गस्त घालताना सहकारी नदीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागला. हे पाहून 23 वर्षीय लेफ्टनंट शशांक तिवारी यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. पाण्याच्या वेगवान प्रवाहात प्रयत्नांची पराकाष्टा करत त्यांनी सहकाऱ्याचा जीव वाचवला. मात्र तिवारी स्वतःचा बचाव करु शकले नाही आणि त्यांना वीरमरण आले. शशांक तिवारी हे मूळचे उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी आहेत.
शशांक तिवारी यांचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असून सध्या अमेरिकेत कर्तव्यावर आहेत. ते शुक्रवारी रात्री उशिरा देशात पोहचतील. यामुळे शनिवारी शासकीय इतमामात जमथरा घाटावर शशांकचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. 2019 मध्ये शशांकचे एनडीएत सिलेक्शन झाले. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी आर्मी जॉईन केली. गेल्या वर्षी त्यांना कमिशन मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग सिक्कीममध्ये झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List