नवे सीबीआय संचालक कोण? पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा
सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या नव्या संचालकांच्या नियुक्तीप्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित होते.
सीबीआय संचालकांची नियुक्ती त्रिसदस्यीय समितीद्वारे करण्यात येते. या समितीत पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असतो. नियुक्ती बाबत बैठक होते. नावांवर चर्चा होते. त्यानुसार सरकारकडे शिफारस करण्यात येते. त्यानंतर केंद्र सरकार सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड करते. सध्या प्रवीण सूद हे सीबीआयचे संचालक आहे. 25 मे 2023 रोजी त्यांनी पदभार सांभाळला. 2024 मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु, त्यांना सीबीआयचे संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List