आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
आंबेगाव तालुक्यात मागील सहा दिवसापासून दुपारनंतर अवकाळी पावसाने थैमान घातले असून यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत .आहे त्यात आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महाळूंगे पडवळ गावातील चासकर मळा येथील शेतकरी सुनील बबनराव चासकर यांच्या कांद्याच्या बराखीवर वीज पडून कांद्याची बराख पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारपासून तालुक्यात सर्वत्र ढग भरून आले होते साडेचार पाचच्या सुमारास पावसाला सर्वत्र सुरुवात झाली. मागील सहा दिवसापासून सतत दुपारनंतर येणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग आधीच सावध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांची पिके कांदा वाचविण्यात त्यांना यश आले आहे. सध्या कांद्याला बाजार भाव कमी असल्यामुळे बहुतांश शेतकरी आपला कांदा कांद्याच्या बराखी मध्ये साठवणूक करून जेव्हा कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल तेव्हा विक्रीस काढता येईल या आशेने ठेवत आहे.
आज सायंकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली त्यात महाळुंगे पडवळ परिसरात जोरदार पावसासह वीजांचा कडकडाट झाला त्यावेळी शेतकरी सुनील चासकर यांच्या कांद्याच्या बराखीवर विज पडली यात कांद्याची बराख पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बराखी मध्ये सुमारे 300 पिशवी कांदा असल्याचे समजते. आजूबाजूला घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. महाळुंगे पडवळ गावच्या सरपंच सुजाता चासकर यांच्या घराच्या बाजूलाच बराखी असून बराखी जळाल्याचे लक्षात येताच सरपंच सुजाता चासकर, सचिन चासकर यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांबरोबर आग विझवण्याचा प्रयत्न केला. बराखी पूर्णपणे लाकडाची असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये शेतकरी सुनील चासकर यांचा कांदा व बराखी पूर्णपणे जळून गेले असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. सदर शेतकऱ्याची वीज पडून मोठे नुकसान झाले आहे याची शासनाने पंचनामा करून शेतकऱ्याला भरपाई मिळावी अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List