पुष्पा 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला?
पुष्पा पार्ट 1 आणि पुष्पा पार्ट 2 या दोन्ही चित्रपटांनी अभिनेता अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळून दिली. या चित्रपटांमुळे अल्लू अर्जुन हा केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरता मर्यादीत न राहाता एक आयकॉनिक अभिनेता बनला आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची स्टाईल त्यांची भूमिका आणि अभिनयामुळे अल्लू अर्जुनला देशभरातच नाही तर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटांमुळे अल्लू अर्जुनला ते यश मिळालं जे यश कधीकाळी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना मिळालं होतं. हा चित्रपट एवढा जबरदस्त हीट ठरला की पुष्पा ही अल्लू अर्जुनची नवी ओळख बनली आहे. प्रसिद्ध डायरेक्टर रामगोपाल वर्मा यांनी देखील या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. या चित्रपटानं नवा इतिहास रचल्याचं त्यांनी म्हटलं आहे.पुष्मा म्हणून अल्लू अर्जुनची प्रतिमा या दोन चित्रपटांमुळे अजरामर झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान इतिहासामध्ये पाहिलं तर असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये काम करणारे अभिनेते त्यांच्या भूमिकेमुळे वर्षानुवर्ष लक्षात ठेवले जातात. त्यांनी त्यामध्ये साकारलेली भूमिका त्यांना एक नवी ओळख मिळून देते. पुष्पाचा देखील याच चित्रपटांच्या श्रेणीमध्ये समावेश होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, पुष्पाचा पहिला पार्ट हा ब्लॉकबास्टर ठरला, अल्लू अर्जुनला या चित्रपटामुळे एक नवी ओळख मिळाली. त्यानंतर पुष्पाचा दुसरा पार्ट देखील सुपर डुपर हीट, ब्लॉकबास्टर ठरला आहे, या यशाकडे कसा पाहातोस? असा प्रश्न अल्लू अर्जुनला टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी काही दिवसांपूर्वी वेव्स समिट 2025 मध्ये विचारला होता. यावेळी अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
कोणत्याही अभिनेत्यासाठी मीडियाकडून त्याला देण्यात येणारं नाव, नवी ओळख ही खूप महत्त्वाची असते, अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर सुपरस्टार, मेगास्टार, बिग बीपासून महानायक अशी त्यांची ओळख बनली. आता तुम्ही देखील सुपरस्टारच्या पुढे गेला आहात, त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, आता तो कोणता परफेक्ट शब्द असेल ज्या नावानं तुम्हाला ओळखलं जावं असं वाटतं असा प्रश्न यावेळी टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी अल्लू अर्जुनला विचारला.
या प्रश्नाला अभिनेत्यानं अत्यंत साधेपणानं उत्तर दिलं, खरं पाहिलं तर मी पण असा एखादा शब्द माझ्यासाठी शोधत असल्याचं अल्लू अर्जुनने म्हटलं आहे. तो पुढे बोलताना म्हणाला की, माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आज संपूर्ण देश मला ओळखतो, मात्र मी अजूनही स्वत:ला एक रीजनल ॲक्टरच समजतो. मी दक्षिणेकडील राज्यांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे.मात्र पुष्पामुळे माझी देशभरात ओळख झाली, मला लोकांचं खूप प्रेम मिळालं त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे, आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, असं अल्लू अर्जुनने म्हटलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List