ती घटना नाही तर, कियाराची मावशी असती सलमान खानची बायको, खान कुटुंबालाही मान्य होतं नातं पण…
Salman Khan and his Love Life: अभिनेता सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान याचे संबंध आज सर्वांना माहित आहे. पण संगीता बिजलानी हिच्याआधी देखील सलमानच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
रिपोर्टनुसार, बॉलिवूडच्या सुपरस्टारची पहिली गर्लफ्रेंड दिग्गज अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री किआरा आडवाणी (Kiara Advani) हिची मावशी शाहीन जाफरी (Shaheen Jaffrey) होती. कॉलेजमध्ये सलमान आणि शाहीन एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. खान कुटुंबियांना देखील दोघांचं नातं मान्य होतं. एवढंच नाही तर, लग्नापर्यंत गोष्ट पोहोचली होती… असं देखील सांगण्यात येतं. पण लग्न झालं नाही. अचानक असं घडलं ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती.
रिपोर्ट्सनुसार, हीच वेळ होती जेव्हा संगीता बिजलानी सलमान खान आणि शाहीनच्या आयुष्यात आली. आयुष्यात संगीता हिची एन्ट्री झाल्यामुळे शाहीन हिच्यासोबत असलेलं सलमान खान यांचं नातं संपलं. त्यानंतर शाहीन आणि सलमान खान यांचं ब्रेकअप झालं. संगीता जेव्हा सलमान खान याला भेटली, तेव्हा तिचं देखील बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत ब्रेकअप झालं होतं.
सलमान आणि संगीता यांची ओळख एका हेल्थ सेंटरमध्ये झाली होती. ओळख झाल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत होत्या. भेटीचं रुपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मेत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या. पण दोघांचं नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. संगीताला 10 वर्ष डेट केल्यानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अली हिची एन्ट्री झाली आणि संगीतोसोबत भाईजानचं ब्रेकअप झालं.
सलमान याच्यापासून विभक्त झाल्यानंतर संगीता बिजलानी हिने माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. आता सलमान खान याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये संगीता उपस्थित असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List