मुंबई विमानतळावर एनआयएची मोठी कारवाई, आयएसआयएसशी संबंधित दोघांना पकडले; दोघांवरही तीन लाखांचे बक्षीस

मुंबई विमानतळावर एनआयएची मोठी कारवाई, आयएसआयएसशी संबंधित दोघांना पकडले; दोघांवरही तीन लाखांचे बक्षीस

पुणे येथे वर्ष 2023 मधील आईडी प्रकरणात फरार असलेल्या दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या स्लीपर मॉडय़ूलशी संबंधित असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.

अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियाच्या जकार्ता येथे लपून बसले होते. तेथून हिंदुस्थानात पुन्हा परतण्याच्या प्रयत्नात असताना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागाने त्यांना अडवले. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. तसेच दोघांवर माहिती देणाऱ्याला प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणात याआधी आठ जणांना पकडण्यात आले असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. हे सर्व आरोपी आयएसआयएसच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया घडवून देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी होते.

या आठ जणांना आधीच अटक केली

याप्रकरणी आतापर्यंत  मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादीर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन आणि शहनवाज आलम यांना अटक झालेली आहे.

काय केले होते?

अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाडय़ाने घर घेऊन तिथे स्पह्टके तयार केली होती. वर्ष 2022 ते 2023 या कालावधीत या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर घेतले गेले होते, तसेच त्यांनी बनवलेल्या आयईडीचे नियंत्रणीत स्पह्ट घडवून आणून त्याची चाचणीही घेतली होती. या प्रकरणात एनआयएने याआधीच 10 आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए), स्पह्टके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन? Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?
मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटा आताच मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे...
या अभिनेत्रीने केली पहलगामच्या तुरुंगात शूटिंग; खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरली बिनधास्त
सी सेक्शन कंफर्ट; सुनील शेट्टीला लेक अथियाच्या प्रसूतीवर कमेंट करणं पडलं महागात, झाले ट्रोल
मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर संकट, BMC कडून नोटीस जारी, काय आहे प्रकरण?
राज्यात दोन दिवस पावसाचे; मुंबईसह ठाणे, रायगडला सतर्कतेचा इशारा
मालाडमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण – मिथुन चक्रवर्ती यांना BMC ची नोटीस
धोनीचेच फॅन्स खरे, बाकीच्यांचे पेड; हरभजन सिंगचे मोठे विधान