‘चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं…’, आगरी भाषेत निक्की तांबोळीने विनायक माळीसाठी घेतला खास उखाणा
Nikki Tamboli: अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार निक्की तांबोळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये निक्की अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अधिक चर्चेत आली. आता देखील निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निक्कीने विनायक माळीसाठी खास उखाणा घेतला आहे.
निक्कीने विनायक माळीसाठी आगरी भाषेत उखाणा घेतला आहे. खास अंदाजात उखाणा घेत निक्की तांबोळी म्हणाली, ‘चांदीच्या वाटीत मचणांचं तुकडं…. घास भरवते मेल्या तोंड कर इकडं…’ सध्या निक्कीने विनायकसाठी घेतलेला उखाणा सर्वत्र चर्चेत आहे.
निक्कीने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात निक्कीने विनायक याच्यासाठी उखाणा घेतला. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘दादूस… पूर्ण शो गाजवणर आगरी कोळी ऑन फायर…’ अन्य एक चाहता म्हणाला, ‘उखामा एकदम भारी…’ अशा कमेंट्स सध्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.
‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाबद्दल सांगायच झालं तर, कार्यक्रमात सेलिब्रिटी वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसणार आहेत. कार्यक्रमाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कार्यक्रमात मराठी कलाविश्वातील अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार आणि सोशल मीडिया स्टार दिसणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात निक्की तांबोळी आणि विनायक माळी यांच्यासोबत मधुराणी गोखले, रुपाली भोसले, आशिष पाटील, माधुरी पवार आणि गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि इतर कलाकार देखील दिसणार आहे. कार्यक्रमाच्या होस्टची जबाबदारी अभिनेता अमेय वाघ याच्या खांद्यावर आहे. महत्त्वाचं म्हणजे, सेलिब्रिटींना बनवलेल्या पदार्थांचं परीक्षण देखील केलं जाणार आहे. यासाठी सेलिब्रिटी शेफ जयंती कठाळे मुख्य भूमिकेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List