कोरोनाचे भूत मानगुटीवरून उतरेना, मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोनाचे भूत मानगुटीवरून उतरेना, मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ

एकीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असे प्रशासनाने म्हटले आहे. 2020 आणि 2021 साली कोरोनाची लाट आली होती आणि त्यात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता ही लाट नसून फक्त काही रुग्णांची संख्या वाढली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. केंद्र सरकाच्या वेबसाईटनुसार सध्या देशात कोरोनाचे 93 सक्रिय रुग्ण आहेत. महिन्याकाठी मुंबईत 8 ते 9 रुग्ण आढळतात अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच कोरोना हा आपल्यात राहणारच आहे असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे असले तरी शहरातल्या तापाच्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शनिवारीही ब्रीच कँडी रुग्णालयातही कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 200 इतकी झाली आहे. तसेच रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;