मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?

मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. आता ‘बिग बॉस 18’चा माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विवियन डिसेनाने घटनेच्या दहा दिवसांनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे विवियनने धर्माच्या आधारे पर्यटकांवर निशाणा साधणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात राग व्यक्त केला आहे.

त्याने लिहिलं, ‘जर हिंदू असल्यामुळे तुम्हाला हिंदूंचा तिरस्कार वाटत असेल तर मी हिंदू आहे. जर तुम्हाला मुस्लिम असल्यामुळे त्या मुस्लिमांचा तिरस्कार वाटत असेल तर मी मुस्लिम आहे. जर तुम्ही जन्माच्या आधारावरून खालच्या जातीच्या लोकांचा द्वेष करत असाल तर मी दलित आहे. मी तो माणूस आहे, ज्याचा तुम्ही द्वेष करता आणि मी नेहमी तसाच राहीन आणि माझाच विजय होईल. स्वत:चं डोकं शांत राहावं यासाठी तुम्हाला बदलण्याची गरज आहे. मी जसा आहे तसा आहे. यापुढेही मी तसाच राहीन, जसं मला राहायचं आहे. तुम्ही शांतीने राहा किंवा आपल्याच द्वेषात घुटमळत राहा, मी तर इथेच राहणार आहे.’

विवियन डिसेनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता अली गोणीने लिहिलं, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने मी खूप दु:खी आणि रागात आहे. निरपराध लोकांच्या विरोधातील हा हल्ला इस्लामच्या शिकवणींविरोधात आहे. अशा कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र राहायला हवं.’ तर असिय रियाजने म्हटलंय, ‘सुंदरतेने परिपूर्ण असलेलं खोरं आता एका भयानक दृश्यात बदललंय. आज काश्मीर रडतोय आणि आम्हीसुद्धा. दहशतवादाने आयुष्य, भविष्य आणि शांती हिरावून घेतलंय. या घृणास्पद कृत्याची मी निंदा करतो.’

विवियनने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला’, ‘शक्ती: अस्तित्त्व के एहसास की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय. विवियन बिग बॉसच्या अठराव्या सिझनमध्ये सहभागी झाला होता. तोच या सिझनचा विजेता बनणार, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत होता. परंतु विवियनला मात देत करणवीर मेहराने ट्रॉफी जिंकली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विभागाचा निधी वळवला मग 100 दिवसांचा रिपोर्ट कार्ड चांगला कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा व्यक्त केली खदखद विभागाचा निधी वळवला मग 100 दिवसांचा रिपोर्ट कार्ड चांगला कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्ये 100 दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन...
लहानपणी आई-वडिलांचे निधन, आश्रमात मोठी झाली अभिनेत्री; मुंबईत दिग्दर्शकासोबत वाईट अनुभव
“बॉलिवूड खूप वाईट…” इरफान खानचा लेक बाबिल खान डिप्रेशनमध्ये, रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
‘आश्रम 3’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहणकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “
हेमा मालिनी आजपर्यंत चढल्या नाहीत सवतीच्या घराची पायरी, लग्नाच्या 44 वर्षांनंतर धर्मेंद्र यांच्यापासून राहतात वेगळ्या
‘छावा’ सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत
शुभमन नाही, ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय सारा तेंडुलकर? बिग बींच्या नातीसोबत खास कनेक्शन