मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर संकट, BMC कडून नोटीस जारी, काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना BMC ने नोटीस जारी केली आहे. मुंबईतील मालाड परिसरातील एरंगल गावात एका भूखंडाच्या तळमजल्यावर परवानगीशिवाय बांधकाम केल्याचा आरोप मिथुन यांच्यावर आहे. याबद्दल बीएमसीने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यावर अद्याप मिथुन चक्रवर्ती यांनी अधिकृत वक्तव्य केलं आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नोटीस मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना आता बांधकाम का पाडू नये याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा नेमकं कारण सांगू शकले नाही तर बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल… असा बीएमसीने इशाराही दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकाने मड परिसरात 100 हून अधिक बेकायदेशीर बांधकामे शोधली आहे. यामध्ये काही असे देखील बंगले आहेत जे चुकीच्या नकाशांच्या आधारे बांधले गेले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत इमारती पाडण्याचा तयारीत बीएमसी आहे. याचा अर्थ बीएमसी बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच्या तयारीत आहे.
मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 351(1अ) अंतर्गत बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस पाठवली आहे. सांगायचं झालं तर, 10 मे रोजी मिथुन चक्रवर्ती यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्तर देण्यासाठी अभिनेत्याला एक आठवड्याला अवधी देण्यात आला आहे. बांधकान का पाडलं जाऊ नये यासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी स्पष्ट करावं लागणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एरंगल गावातील हीरा देवी मंदिराजवळील तपासणीदरम्यान अनेक बेकायदेशीर बांधकामे आढळून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेथे दोनपेक्षा जास्त मेझानाइन मजले असलेल्या इमारती, एक तळमजला इमारत आणि विटा, लाकूड, काच आणि एसी शीटपासून बनवलेल्या तीन तात्पुरत्या झोपड्या आढळल्या. हे सर्व परवानगीशिवाय बनवलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List