धोनीचेच फॅन्स खरे, बाकीच्यांचे पेड; हरभजन सिंगचे मोठे विधान
महेंद्र सिंग धोनीचेच फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे फॅन्स हे पेड आहेत असे विधान हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने केले आहे. तसेच धोनीने अजूनही खेळलं पाहिजे असेही हरभजन म्हणाला आहे.
महेंद्र सिंग धोनी हा हिंदुस्थान क्रिकेट टीमचा माजी खेळाडू आहे. त्याच्याच नेतृत्वात 2011 साली हिंदुस्थानने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. महेंद्रसिंह धोनीने 2020 साली निवृत्त झाला होता. धोनी आजही चेन्नई सुपरकिंग्जसाठी खेळतोय.
धोनीचे फॅन्स खरे आहेत असा दावा हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने केला आहे. एका कार्यक्रमात हरभजन सिंग म्हणाला की धोनीने अजूनही खेळलं पाहिजे, माझी टीम असती तर मी वेगळा निर्णय घेतला असता. मला वाटतं की खरे फॅन हे धोनीचेच आहेत. बाकीच्यांचे फॅन हे पेड आहेत. बाकी जे फॅन्स आहेत ते बनवलेले आहेत सोशल मीडियावर. तुम्ही इकडे तिकडे नंबर पाहता ते सोडून द्या असेही हरभजन सिंग म्हणाला.
harbhajan singhin-directly Targeted Virat fans? as Paid instagram fans#chinnaswamystadium #RcbvsKkr pic.twitter.com/KYZygETjbP
—
King Kohli Fan Page (@Hracingchannel) May 17, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List