सी सेक्शन कंफर्ट; सुनील शेट्टीला लेक अथियाच्या प्रसूतीवर कमेंट करणं पडलं महागात, झाले ट्रोल
बॉलिवूडचे सुपरस्टार सुनील शेट्टी यांनी आपली मुलगी अथिया शेट्टी आणि जावई केएल राहुल यांच्या मार्च महिन्यात जन्मलेल्या मुली, इवारा यांच्या जन्माबद्दल आनंदाने सांगितलं. अथियाने नैसर्गिक प्रसूतीचा वेदनेचा मार्ग निवडला आणि सिझेरियन डिलिव्हरीचा पर्याय टाळला, याबद्दल सुनील शेट्टी यांनी कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी लेक अथियाच्या धैर्य आणि सामर्थ्याबद्दल मनापासून कौतुक करत होते.
लेकीच्या डिलिव्हरीवर काय म्हणाले सुनील शेट्टी
सुनील शेट्टी म्हणाले, “आजच्या जगात, जिथे प्रत्येकजण सिझेरियन डिलिव्हरीचा सोपा मार्ग निवडतात, तिथे अथियाने स्वतःच्या इच्छेने नैसर्गिक प्रसूतीचा वेदनेचा मार्ग स्वीकारला.” त्यांनी पुढे सांगितले की, “रुग्णालयातील प्रत्येक नर्स आणि बालरोगतज्ज्ञांनी अथियाच्या या प्रक्रियेला अविश्वसनीय म्हटले. एक पिता म्हणून, ही गोष्ट मला खूप प्रभावित करते. मी विचार करतो, ‘व्वा, ती किती तयार होती!’ अथिया या निर्णयासाठी खूपच मजबूत होती. तिची आई, स्वतः एक मजबूत स्त्री आहे आणि अथियाने हे सगळे कदाचित तिच्याकडून शिकले आहे. अथिया एक सुंदर माता आहे. तिने कधीही थकवा, तणाव किंवा उदासीनता दाखवली नाही,” अस म्हणत सुनील शेट्टी यांनी लेकीचं कोतुक केलं.
“आथिया एक स्ट्रॉंग आई….”
त्यांनी अथियाच्या मातृत्वाबद्दल कौतुक करताना पुढे म्हटले, “अथियाने मातृत्वाला मासा पाण्यात जसा पोहतो तसे स्वीकारले आहे. ती खरोखरच अप्रतिम आहे. प्रत्येक पिता आपल्या मुलीला लहान मुलीच्या रूपात पाहतो. मीही तसेच विचार केला आणि मनात शंका होती की ती मातृत्व सांभाळू शकेल का? पण ती अविश्वसनीय आहे! मी दररोज माना यांना सांगतो की मला अथियाचा किती अभिमान आहे. तिने या नवीन जीवनाला स्वीकारले, सर्व गोष्टी हाताळल्या आणि प्रसूती प्रक्रिया तिच्या पद्धतीने पूर्ण केली, याचा मला खूप गर्व वाटतो.”
सी सेक्शनबद्दलच्या विधानावरून सुनील शेट्टी ट्रोल
मात्र, सुनील शेट्टी यांनी सिझेरियन डिलिव्हरीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर काही युजर्स नाराज झाले आहेत. त्यांनी ‘सिझेरियन हा सोपा मार्ग’ असे संबोधल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. काही युजर्सनी याला असंवेदनशील विधान मानले असून, सोशल मीडियावर त्यांच्यावर ट्रोलिंग होत आहे. सिझेरियन डिलिव्हरी हा वैद्यकीय गरजेनुसार किंवा वैयक्तिक निवडीचा पर्याय असू शकतो, आणि त्याला ‘सोपा’म्हणणे अनेकांना खटकले आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना सुनील शेट्टी यांचे सी सेक्शनबद्दलचे विधान आवडलं नसेल त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List