राज्यात दोन दिवस पावसाचे; मुंबईसह ठाणे, रायगडला सतर्कतेचा इशारा

राज्यात दोन दिवस पावसाचे; मुंबईसह ठाणे, रायगडला सतर्कतेचा इशारा

अवकाळी पावसाने राज्यात काही ठिकाणी उष्णतेपासून सुटका झाली असली तरी मुंबई आणि परिसरात वाढत्या आर्द्रतेमुळे प्रंचड उकाडा जाणवत आहे. तसेच आता पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह मुंबईत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत शनिवारी सकाळपासून वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि गोरेगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली
पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रासायनिक कारखान्यामध्ये निष्काळजीमुळे गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या...
‘संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते’, रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं
प्रसिद्ध अभिनेत्रीला खूनाच्या आरोपाखाली विमानतळावरच अटक, वाचा सविस्तर
मी तिला किस…; जीनत अमानसोबत रोमांस करण्यास नकार, पण या अभिनेत्रीसाठी मोडल्या इंटिमेसीच्या मर्यादा
इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, 125 जणांचा मृत्यू
IPL 2025 – पंजाबचा किंग्जचा दबदबा कायम, अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा पराभव
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा, हिंदुस्थानातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा होता सूत्रधार