राशिभविष्य – रविवार 18 मे 2025 ते शनिवार 24 मे 2025

राशिभविष्य – रविवार 18 मे 2025 ते शनिवार 24 मे 2025

>> नीलिमा प्रधान

मेष- चौफेर सावध रहा
मेषेच्या धनेषात बुध, शुक्र, मंगळ त्रिकोण योग. गुप्त कारवाया वाढतील, मात्र चौफेर सावध राहिल्यास अनेक समस्या लवकर सोडवता येतील. प्रवासात काळजी घ्या. नोकरीमध्ये दबाव राहील, यश मिळेल. धंद्यात वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नवे डावपेच टाकता येतील. भेट घ्या. चर्चा करा. जवळच्या व्यक्ती वादग्रस्त विधान करण्याची शक्यता.
शुभ दि. 19, 20

वृषभ- कामे रेंगाळत ठेवू नका
स्वराशीत बुध, चंद्र, शुक्र युती. ताणतणाव कमी करून एकोप्याने पुन्हा कामास सुरुवात करता येईल. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. नोकरीमध्ये बढती होईल. धंद्यात वाढ होईल. कर्जाच्या कामाला गती मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत उत्साह, आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. लोकप्रियता वाढेल. थोरा-मोठय़ांचा सहवास लाभेल.
शुभ दि. 22, 23

मिथुन- वाद वाढवू नका
मिथुनेच्या व्ययेषात बुध, शुक्र, मंगळ त्रिकोण योग. सप्ताहाच्या सुरुवातीला कोणताही वाद वाढवू नका. कायदा सर्वत्र पाळा. पैशाचा अपव्यय होईल. नोकरीत चूक टाळा. धंद्यात सतर्क राहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत समोर संधी दिसत असली तरी घाई करू नका. कोणतेही वक्तव्य, कृती घातक ठरू शकते. प्रतिष्ठा जपा.
शुभ दि. 23, 24

कर्क- काळजीपूर्वक सल्ला घ्या
कर्केच्या एकादशात बुध, सूर्य, प्लुटो त्रिकोण योग. चतुराई, मधुर भाष्य, तत्परता ठेवत कामे करून घ्या. भलत्या व्यक्तीचा सल्ला समस्या निर्माण करू शकतो. नोकरीमध्ये कौशल्य दाखवाल. धंद्यात गुंतवणूक करताना घाई नको, राजकीय-सामाजिक क्षेत्रात ताणतणाव जाणवेल. अहंकार दूर ठेवा. वरिष्ठ बाजू घेण्याचा प्रयत्न करतील.
शुभ दि. 23, 24

सिंह – प्रवासात सावध रहा
सिंहेच्या दशमेषात बुध, चंद्र, गुरू त्रिकोण योग. वादग्रस्त प्रसंगाला योग्य कलाटणी द्या. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रवासात सावध रहा. नोकरीमध्ये कामाचा ताण राहील. धंद्यात चोरीपासून सावध रहा. अनाठायी खर्च होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कुणालाही कमी लेखू नका. वरिष्ठांची मदत होईल. प्रतिष्ठा जपता येईल.
शुभ दि. 20, 21

कन्या – प्रगतीचा टप्पा गाठाल
कन्येच्या भाग्येषात बुध, सूर्य, प्लुटो त्रिकोण योग. विरोधकांना योग्य प्रकारे शह देऊन प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. नोकरीत हुशारी दिसेल. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत मुद्दे प्रभावी ठरतील, वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. लोकसंग्रह वाढेल. योजना पूर्ण करा. मान-सन्मानात वाढ होईल.
शुभ दि. 23, 24

तूळ – अनाठायी खर्च होईल
तुळेच्या अष्टमेषात बुध, चंद्र, मंगळ प्रतियुती. संघर्षानेच यश खेचावे लागेल. ताणतणावाचे प्रसंग येतील. नात्यात-मैत्रीत गैरसमज होतील. अनाठायी खर्च होईल. नोकरीमध्ये कामाचा व्याप जाणवेल. धंद्यात कराराची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांचा दबाव राहील. कोणतेही भाष्य करताना कायद्याला विसरू नका.
शुभ दि. 20, 21

वृश्चिक – नवे परिचय उत्साहवर्धक
वृश्चिकेच्या सप्तमेषात बुध, चंद्र, शुव्र्र लाभयोग. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन परिचय उत्साहवर्धक वाटेल. थोरा-मोठय़ांच्या सहवासाने सन्मानात भर पडेल. नोकरीमध्ये बदलाची शक्यता. प्रशंसनीय काम कराल. कर्जाचे काम करून घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नवे संबंध प्रस्थापित कराल.
शुभ दि. 22, 23

धनु – कायदा पाळा
धनुच्या षष्ठेशात बुध, चंद्र, गुरू त्रिकोण योग. विविध प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागेल. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात वाद-संवाद तणावाकडे जाण्याची शक्यता. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मतप्रदर्शन करण्याचा उतावळेपणा नको.
शुभ दि. 18, 19

मकर – आत्मविश्वास वाढेल
मकरेच्या पंचमेषात बुध, चंद्र, मंगळ प्रतियुती. उत्साह – आत्मविश्वास वाढवणाऱया घटना तुमच्या क्षेत्रात घडतील. आपले धोरण इतरांच्यावर लादण्यापेक्षा सर्वांच्या विचारानेच राजकीय-सामाजिक क्षेत्रांत निर्णय घ्या. मैत्रीच्या भावनेने वागा. लोकसंग्रह वाढेल. कठोर बोलणे नको. नोकरीत अचानक बदल होईल. नवे काम मिळवा. पर्यटनाचा आनंद घ्याल.
शुभ दि. 20, 22

कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या
कुंभेच्या सुखेषात बुध, चंद्र, मंगळ प्रतियुती. क्षुल्लक ताणतणाव जाणवतील. प्रकृतीची काळजी घ्या. कायद्याच्या कक्षेत राहून कामे करा. नोकरीमध्ये परस्पर विरोधी घटना घडतील. नवीन परिचय उत्सावर्धक ठरेल. धंद्यात खर्च होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आरोप होतील. विरोधक मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. व्यवहारात सावध रहा.
शुभ दि. 23, 24

मीन – तणाव वाढवू नका
मीनेच्या पराक्रमात बुध, सूर्य, प्लुटो त्रिकोण योग. घरगुती तणाव वाढवू नका. भावनेच्या भरात चूक करू नका. नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. नवीन परिचय वाढतील. धंद्यात सुधारणा करताना जुन्या चुका करू नका. कर्जाचे काम करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नवीन संधी मिळेल. तुमचे मुद्दे प्रभावी वाटतील. आर्थिक सहाय्य मिळेल.
शुभ दि. 18, 19

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन? Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?
मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटा आताच मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे...
या अभिनेत्रीने केली पहलगामच्या तुरुंगात शूटिंग; खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरली बिनधास्त
सी सेक्शन कंफर्ट; सुनील शेट्टीला लेक अथियाच्या प्रसूतीवर कमेंट करणं पडलं महागात, झाले ट्रोल
मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर संकट, BMC कडून नोटीस जारी, काय आहे प्रकरण?
राज्यात दोन दिवस पावसाचे; मुंबईसह ठाणे, रायगडला सतर्कतेचा इशारा
मालाडमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण – मिथुन चक्रवर्ती यांना BMC ची नोटीस
धोनीचेच फॅन्स खरे, बाकीच्यांचे पेड; हरभजन सिंगचे मोठे विधान