अनेक महिलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, आज वयाच्या 58 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत करतोय संसार
झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगत येत नाही. झगमगत्या विश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी वयाच्या चाळीशीनंतर लग्न केलं. तर अनेकांनी चार – पाच वेळा संसार थाटला. एवढंच नाही तर, असे देखील काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर कधी लग्नाचा किंवा रिलेशनशिपचा देखील विचार केला नाही. पण बॉलिवूडमध्ये असा देखील एक अभिनेता आहे, ज्याने अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात तर अडकवलं पण वयाच्या 58 व्या वर्षी स्वतःपेक्षा 26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केलं.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंग सोमण आहे. मिलिंद सोमण याचं नाव अनेक सेलिब्रिटी महिलांसोबत जोडण्यात आलं. मिस यूनिव्हर्स 1992 ची सेकेंड रनरअप मधू सप्रे हिच्यासोबत देखील मिंलिंद रिलेशनशिपमध्ये होता… असं अनेकदा सांगण्यात आलं.
रिपोर्टनुसार, दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. पण त्यांचं फार काळ टिकलं नाही. अखेर 1995 मध्ये मधू आणि मलिंद यांचं ब्रेकअप झालं.
मिलिंद सोमण याचं पहिलं लग्न
मिलिंद सोमण याची ओळख व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सेटवर मायलीन जंपनोईला हिच्यासोबत झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अखेर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि मायलीन यांनी 2006 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सना डेट केल्यानंतर अभिनेत्याने वयाच्या 58 व्या वर्षी स्वतःपेक्षा 26 वर्ष लहान अंकिता कोंवर हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. मिलिंद याला अनेकांनी ट्रोल देखील केलं. पण अभिनेत्याने सर्वत्र दुर्लक्ष करत स्वतःच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं.
एवढंच नाही तर, अभिनेत्याने अनेकादा पत्नी अंकिता कोंवर हिच्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम पत्नीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. दोघांबद्दल सांगायचं झालं तर, अंकिता कोंवर आणि मिलिंद सोमण प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे चाहत्यांनी फिट राहण्याचा सल्ला आणि टीप्स देत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List