रामायण चित्रपटाचे टिझर ‘या’ दिवशी येणार, पण ‘या’ ट्विस्टमुळे होणार अनेकांची निराशा!
नितेश तिवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला रामायण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट एकूण दोन भागांत येणार आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची पहिली झलक विश्व ऑडिओ व्हिज्यूअल अँड मनोरंजन संमेलनात दाखवली जाणार आहे. येत्या 2 किंवा 3 मे रोजी ही पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
दरम्यान या चित्रपटात सनी देओल, लाला दत्ता, इंदिरा कृष्णा हे दिग्गज कलाकारही महत्त्वाची भूमिका करताना दिसतील. या इव्हेंटमध्ये चित्रपटाचे टिझर दाखवले जाणार आहे मात्र सर्वसामान्य लोकांसाठी हे टिझर नसेल. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List