या 5 भारतीय चित्रपटांनी पाकिस्तानात धुमाकूळ घातला, पहिल्या चित्रपटाचे नाव ऐकून वाटेल अभिमान
पहलगम हल्ल्यानंतर सध्या तणावाचं वातावरण दिसतं आहे. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या भारतीयांसाठी पाकिस्तानविरूद्ध कठोर पाऊल उचलण्याची मागणीही होत आहे. मात्र या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर भूमिका घेतल्या आहेत.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पाकिस्तानशी जोडलेल्या होत्या त्यासर्वांवर भारताने एक एक करून बंदी आणली आहे. मग ते पाकिस्तानी कलाकार असो किंवा मग त्यांचे सोशल मीडिया अकाउंट असो सर्वांवर भारत सरकारने थेट बंदी घातली आहे. पण एक गोष्ट सर्वांना माहित आहे की भारतीय फॅशन असो किंवा खाण्याच्या सवयी, जवळजवळ प्रत्येक गोष्ट पाकिस्तानी लोक फॉलो करतात. त्यात पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटही तर आवर्जून पाहिले जातात.
आताही पाकिस्तानी लोकांनी सर्वाधिक पाहिलेले चित्रपट हे भारतीय आहेत. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेले भारतीय चित्रपटांच्या नावांची यादी समोर आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 10 चित्रपटांची नावे आहेत ज्यापैकी 5 भारतीय आहेत.त्यातल्या पहिल्या चित्रपटाचे नाव ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.
चित्रपटांची यादी
1) पाकिस्तानी लोकांना सर्वाधिक आवडणारा पाच भारतीय चित्रपटांपैकी पहिला चित्रपट म्हणजे ‘टेस्ट’. हा टित्रपट या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या तमिळ स्पोर्ट्स थ्रिलर चित्रपटात आर. माधवन, नयनतारा, सिद्धार्थ आणि मीरा जास्मिन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
2) त्यानंतर नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला भारतीय चित्रपट जो चौथा क्रमांकावर आहे तो म्हणजे ‘आझाद’. अजय देवगणचा ‘आझाद’ हा चित्रपट या वर्षी 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
3) या आठवड्यात नेटफ्लिक्सवर तिसरा सर्वाधिक पाहिलेला भारतीय चित्रपट म्हणजे ‘देवा’. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर ‘देवा’ हा चित्रपट पाकिस्तानच्या ओटीटीवर ट्रेंड करत आहे.
4) हा पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट जो दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे ‘ कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी’. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली, ज्याचा परिणाम पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानी लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे.
5) पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट जो की पहिल्या क्रमांकावर आहे तो चित्रपट म्हणजे ‘छावा’. हा ब्लॉकबस्टर चित्रपट छत्रपती शंभूजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. हा या चित्रपटाने फक्त भारतीतच नाही तर पाकिस्तानातही आपला पहिला क्रमांक सोडला नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List