अभिनेत्री 36 वर्ष खोलीत होती बंद, शेवटच्या क्षणी झालेली भयानक अवस्था, अंत्यसंस्कारही केले लपून, काय आहे रहस्य?
आज अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ, जिने आयुष्यात सर्व सुख अनुभवले पण एक काळ असा आला जेव्हा अभिनेत्रीची अवस्था प्रचंड वाईट झाली, अभिनेत्रने 1- 2 नाही तर तब्बव 36 वर्ष स्वतःला एका खोलीत बंद करुन घेतलं होत. त्या खोलीमध्येच अभिनेत्री राहायची, खायची आणि झोपायची. काही कामासाठी घराबाहेर पडण्याची वेळ अली की, अभिनेत्री चेहरा कपड्याने झाकून घ्यायची. अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून प्रत्येक जण हैराण व्हायचा. पण सर्वत जास्त चकित करणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्री तेव्हाच्या काळात टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल होती आणि अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घ्यायची.
अभिनेत्री फक्त हिंदी सिनेमांमध्येच नाही तर, बंगाली सिनेमांमध्ये देखील स्वतःची भक्कम ओळख निर्माण केला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सुचित्रा सेन आहे. जी मुनमुन सेनची आई होती. सुचित्री यांचे वडील शाळेत हेड मास्तर होते, तर आई गृहिणी… सुचित्रा यांच्या कुटुंबात फिल्मी वातावरण नव्हतं. पण त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती.
आई – वडिलांकडे असताना सुचित्रा यांना अभिनयाची आवड जोपासता आली नाही. पण लग्नानंतर पती आणि सासऱ्यांनी सुचित्रा यांना स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. सुचित्रा सेन यांचं लग्न वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी झालं होतं. सासरच्या मंडळींचा सपोर्ट असल्यामुळे सुचित्रा हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आणि पाहता – पाहता अभिनेत्री मोठी स्टार झाली.
प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर सुचित्रा त्यांच्या कामात व्यस्त झाल्या आणि संसाराकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. त्यांच्या नवऱ्याला परिस्थिती सहन झाली नाही आणि त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. अशात सुचित्राच्या यांच्या पतीला दारुचं व्यसन लागलं आणि 1970 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पतीच्या निधनानंतर देखील सुचित्रा यांनी सिनेमांमध्ये काम करणं सुरु ठेवल. सुचित्रा यांनी अनेक हीट सिनेमे हिंदी सिनेविश्वाला दिले. पण 1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रनोय पाशा’ सिनेमाला अपयश मिळालं आणि सुचित्रा यांच्या करियरला देखील ब्रेक लागला.
एक सिनेमा अपयशी ठरला आणि सुचित्रा यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. सिनेमा अपयशी ठरल्यानंतर सुचित्रा यांनी स्वतःला सर्वांपासून दूर केलं. आपल्या नातेवाईकांपासून देखील त्या लांब झाल्या. सिनेमांपासून दूर राहिल्यानंतर सुचित्रा यांनी आध्यात्मिक जीवनाचा मार्ग स्वीकारला. 2013 मध्ये जेव्हा त्या आजारी पडल्या तेव्हा त्यांना रुग्णालयातही सर्वांपासून लपवून ठेवण्यात आलं.
उपचार सुरु असताना 17 जानेवरी 2014 मध्ये सुचित्रा यांचं निधन झालं. त्यांतं अंत्यदर्शन देखील कोणाला घेता आलं नाही. कारण सुद्धा कोणाला कळवलं नाही. शेवटच्या क्षणी त्यांचा चेहरा देखील कोणाला दिसला नाही. त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील लपून करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List