‘तुला ब्लाउज काढावं लागेल’, बिग बींच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी करताच…
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दिग्दर्शकाच्या मागणीमुळे माधुरीला धक्का बसला होता. ती सेटवरून थेट निघून गेली होती. आता कोणत्या चित्रपटाच्या वेळी हा किस्सा घडला होता चला जाणून घेऊया…
टीनू आनंद हे बॉलीवुडमधील अशी व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी पडद्यावर आणि पडद्यामागे दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अभिनेता म्हणून त्यांनी पडद्यावर आपली छाप पाडली, तर दिग्दर्शक म्हणून त्यांनी अप्रतिम काम केलं. पण तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल माहिती आहे का, ज्यामध्ये त्यांनी माधुरी दीक्षितकडून ब्लाउज काढण्याची विशेष मागणी केली होती?
माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जिने आपल्या अभिनय आणि नृत्याने अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं. एक काळ असा होता, जेव्हा माधुरीचा चित्रपटात असणं म्हणजे चित्रपट हिट होण्याची हमी समजली जायची. पण तुम्हाला टीनू आनंद यांच्या दिग्दर्शनाखालील त्या चित्रपटाचा किस्सा माहिती आहे का, ज्यामध्ये त्यांनी कॅमेऱ्यासमोर माधुरीकडून ब्लाउज काढण्याची मागणी केली होती?
वाचा: मित्रच बनला शत्रू! महिलेच्या फ्लॅटवर पोहोचला, गळ्या जवळ…; पोलिसांना कळताच थरकाप उडाला
या मागणीमुळे सेटवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या दिग्दर्शकाने माधुरीला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात माधुरीसोबत अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता.
रेडियो नशाशी झालेल्या संभाषणात टीनू आनंद यांनी या घटनेचा खुलासा केला होता. ते म्हणाले, “मी माधुरीला संपूर्ण सीनबद्दल सांगितलं होतं. मी तिला सांगितलं होतं की, तुला ब्लाउज काढावं लागेल आणि पहिल्यांदा आम्ही तुला ब्रामध्ये पाहू. मी काहीही लपवू इच्छित नाही, कारण तू एका व्यक्तीसमोर स्वतःला समर्पित करत आहेस, जो तुझी मदत करत आहे.”
दिग्दर्शक पुढे म्हणाले, “मी माधुरीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, ही खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मी हा सीन पहिल्याच दिवशी शूट करू इच्छितो.” माधुरीने याला सहमतीही दर्शवली होती. टीनू यांनी सांगितलं, “मी माधुरीला सांगितलं होतं की, तू तुझी ब्रा डिझाइन करू शकतेस, तुला हवी तशी. पण ती ब्रा असायला हवी. हा चित्रपटाचा पहिला सीन होता. पण सीन तयार होताच माधुरीने तो सीन करण्यास नकार दिला. तिला कॅमेऱ्यासमोर ब्रामध्ये दिसण्यात अस्वस्थता वाटत होती. माधुरी तब्बल 45 मिनिटं ड्रेसिंग रूममधून बाहेर आली नाही.”
दिग्दर्शकाने माधुरीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकली नाही. यामुळे टीनू यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी माधुरीला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि सेट सोडण्याची तयारी केली. अमिताभ यांनीही माधुरीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. निर्माते दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात असतानाच अखेर माधुरीने सीन करण्यास होकार दिला. मात्र, या चित्रपटाचं काही भागच शूट होऊ शकला आणि नंतर निर्मात्यांशी काही वाद झाल्याने हा चित्रपट थांबला. या चित्रपटानंतर माधुरीने पुन्हा कधीही टीनू आनंद यांच्यासोबत काम केलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List