शिल्पामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त…, प्रसिद्ध उद्योजकाच्या पहिल्या बायकोची खंत
अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. शिल्पाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राज कुंद्रा यांची दुसरी पत्नी आहे. राजने जेव्हा शिल्पासोबत दुसरा संसार थाटला तेव्हा उद्योजकाच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर गंभीर आरोप केले.
राज कुंद्राने 2003 मध्ये लंडनमधील एका व्यावसायिक कुटुंबातील मुलगी कविताशी लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 3 वर्षांनी दोघेही वेगळे झाले. 2006 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
पहिल्या घटस्फोटाच्या जवळपास तीन वर्षांनंतर म्हणजे 2009 मध्ये राज कुंद्राने शिल्पासोबत लग्न केलं. पण तरीही कविताने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप केले. कविता म्हणाली की, शिल्पाने राजच्या आयुष्यात प्रवेश केल्यापासून तिच्या वैवाहिक आयुष्यात गोंधळ सुरू झाला. हे सर्व लंडनमध्ये सुरू झालं आणि निमित्त होतं शिल्पा शेट्टीच्या परफ्यूम S2 च्या लाँचिंगचं.
एका मुलाखतीत कविताने शिल्पावर गंभीर आरोप केले. ‘शिल्पाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ती माझ्या पतीसोबत माझं आयुष्य जगत आहे…’ असं देखील कविता म्हणाली होती. यावर राज कुंद्रा याने देखील सडेतोड उत्तर दिलेलं. ‘कविता आणि माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती तेव्हा माझा शिल्पासोबत कोणताही संबंध नव्हता…’ असं राज म्हणला.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009 लग्न केलं. 21 मे 2012 मध्ये शिल्पा हिने मुलगा वियान याला जन्म दिला. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2020 शिल्पा आणि राज यांनी सरोगेसीच्या मदतीने मुलगी समीशा हिचं जगात स्वागत केलं. आज शिल्पा तिचा पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
शिल्पा मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List