WAVES Summit मध्ये सर्वात मोठी घोषणा… बॉलीवूड १, २ नाही तर ९ जागतिक चित्रपट बनविणार
१ मे पासून मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंन्टरटेनमेंट समिट (WAVES ) आयोजित केले आहे, ज्यामध्ये देश आणि जगातील चित्रपटांशी संबंधित लोक सहभागी झाले आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान सारख्या कलाकारांनी विविध चर्चासत्रात भाग घेतला आणि अनेक मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २ मे रोजी आमिर खान, करीना कपूर आणि विजय देवरकोंडा हे देखील स्टेजवर दिसले. दरम्यान,WAVES Summit मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘WAVES २०२५’ च्या व्हिजनने प्रेरित होऊन, लायका ग्रुप (यूके-युरोप) आणि महावीर जैन फिल्म्सने भारतीय चित्रपटांना जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी एकत्रितपणे पुढील दोन-तीन वर्षांत असे नऊ चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे जे भारताची समृद्ध संस्कृती आणि कथा जगासमोर मांडतील.
पोस्ट येथे पाहा…
BIGGG NEWS… LYCA GROUP – MAHAVEER JAIN ANNOUNCE *9 FILMS* AT WAVES 2025… Inspired by Hon’ble Prime Minister Shri #NarendraModi‘s visionary initiative at #Waves2025, #LycaGroup and #MahaveerJainFilms have joined forces to produce 9 #Indian feature films over the next three… pic.twitter.com/UHkhfuA716
— taran adarsh (@taran_adarsh) May 2, 2025
जागतिक सामग्री तयार करण्याचे स्वप्न
ही भागीदारी ‘WAVES’ समिट उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारताला जागतिक ( कंटेन्ट ) सामग्री निर्मितीचे केंद्र बनवणे आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या एक्स-अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या सहकार्याबद्दलची माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. लायका प्रॉडक्शन हे रजनीकांतच्या ‘रोबोट 2.0’ आणि मणिरत्नमच्या ‘पोनियिन सेल्वन’ फ्रँचायझीसाठी ओळखले जाते. आता हे प्रॉडक्शन हाऊस महावीर जैन फिल्म्सच्या सहकार्याने नवीन कथा तयार करण्याची तयारी करत आहे.
उत्तम प्रकल्पांसाठी ओळखले जाते
महावीर जैन फिल्म्सने अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर अभिनीत ‘उंचाई’ या चित्रपटाने आपली छाप पाडली आहे. आता ती कार्तिक आर्यनचा ‘नागझिला’, विक्रांत मेस्सी याचा आगामी चित्रपट श्री श्री रविशंकरचा बायोपिक, इम्तियाज अलीसोबतच्या मैत्रीवर आधारित चित्रपट आणि ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा बायोपिक अशा प्रकल्पांवर काम करत आहे. शिखर परिषदेत, लायका ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अल्लिराजा सुबास्करन आणि महावीर जैन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय चित्रपटांना जागतिक पातळीवर नेण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List