मोबाईल हिसकावला म्हणून संतापली… विद्यार्थिनीने शिक्षिकेवर केला हल्ला

मोबाईल हिसकावला म्हणून संतापली… विद्यार्थिनीने शिक्षिकेवर केला हल्ला

विशाखापट्टणम येथील एका कॉलेजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक विद्यार्थिनी एका प्राध्यापिकेला मारहाण करताना दिसत आहे. एवढेच नाही तर विद्यार्थिनीने शिक्षिकेला घाबरवण्यासाठी प्रथम तिची चप्पल काढली आणि नंतर त्याच चप्पलने शिक्षिकेला मारायला सुरुवात केली.

हे प्रकरण दमक्कीजवळील रघु अभियांत्रिकी महाविद्यालयातील आहे. गुरुगुबेली वेंकटलक्ष्मी ही विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्सच्या दुसऱया वर्षात शिक्षण घेत आहे. ती वर्गात मोबाईलवर मोठ्याने बोलत होती. यावर कॉलेजच्या एका शिक्षिकेने तिचा मोबाईल काढून घेतला, ज्यामुळे ती संतापली. तिने सर्वांसमोर आधी शिक्षिकेशी वाद घातला आणि त्यांना फोन परत करण्यास सांगितले. मग तिने त्यांना धमकावण्यासाठी आपली चप्पल काढली.

जेव्हा शिक्षिकेवर काहीही परिणाम झाला नाही, तेव्हा विद्यार्थिनीने त्यांच्यावर चप्पलने हल्ला करायला सुरुवात केली. शिक्षिकेनेही प्रत्युत्तरादाखल विद्यार्थिनीला थप्पड मारली. या घटनेनंतर महाविद्यालयाने गुरुगुबेलीला तत्काळ निलंबित केले. तसे चौकशी समिती गठीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा… विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत...
शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस या मुलीच्या कुटुंबीयांना देणार 62 लाख; पण नक्की कारण काय?
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन; चाहत्यांनाही वाटेल कौतुक
हाय कोलेस्ट्रोलची समस्या झटक्यात दूर होईल, पतंजलीचे हे औषध खायला सुरुवात करा; रिसर्चमध्ये दावा
Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार
Operation Sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
नागरिकांनो सावधान! पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हिंदुस्थानी अधिकारी भासवून करतेय फोन, वाचा सविस्तर माहिती