पुरंदरमधील विमानतळासाठी जमीन देणार नाही! शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावले

पुरंदरमधील विमानतळासाठी जमीन देणार नाही! शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावले

पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱयांनी आम्ही विमानतळासाठी जमीन देणार नाही, काळ्य़ा आईची सेवाच करणार, असा पक्का निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. त्यावर बावनकुळे यांनी शेतकऱयांना जमिनीच्या मोबदल्यात कोणते पॅकेज हवे याचा प्रस्ताव राज्य सरकारला द्यावा, येत्या सात दिवसांत सर्व गावांनी चर्चा करून राज्य सरकारला प्रस्ताव दिल्यास त्यावर मंत्रिमंडळात चर्चा करू असे आश्वासन दिले.

पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱया शेतकऱयांवर लाठीमार झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी विमानतळाला विरोध करणाऱया गावांमधील प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. पुढील पंधरा दिवस विमानतळ जमिनीसाठीचे कोणतेही सर्वेक्षण होणार नाही. पॅकेज संदर्भात शेतकऱयांकडून प्रस्ताव न आल्यास राज्य सरकार पुढील पंधरा दिवसांत वेगवेगळ्या कायद्यानुसार शेतकऱयांना काय देता येईल, याची पाहणी करून शेतकऱयांना एक प्रस्ताव देईल. त्यावर त्यांनी विचार करावा असे सांगितले.

सरकार मात्र ठाम

पुरंदर येथील विमानतळ होईलच, हा राज्य सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. मोबदल्याविषयीचा चेंडू राज्य सरकारने शेतकऱयांच्या कोर्टात टोलविला आहे. आता शेतकरी नेमकी काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.

गुन्हे तपासून पाहणार

पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर विमानतळ बाधित गावातील अनेक निरपराध शेतकऱयांवर, त्यांच्या मुलांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत ते कमी करावेत, अशी मागणी शेतकऱयांनी बैठकीत केली. त्यावर बावनकुळे यांनी जे निरपराध आहेत त्यांचे गुन्हे तपासून घेऊ. अधिकाऱयांना मारहाण झाल्याचे काही व्हिडिओ आहेत. तेदेखील तपासून उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;