स्वस्तिक क्रीडा मंडळाची हॅटट्रिक, महिलांमध्ये डॉ. शिरोडकरचा दबदबा

स्वस्तिक क्रीडा मंडळाची  हॅटट्रिक, महिलांमध्ये डॉ. शिरोडकरचा दबदबा

श्री मावळी मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 72 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली, तर महिला विभागात मुंबई शहरच्या डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने शिवशक्तीवर मात करत आपला दबदबा दाखवला.

ठाण्यात कबड्डी आयोजनात सर्वात जुने आणि प्रसिद्ध असलेल्या श्री मावळी मंडळाच्या कबड्डी महोत्सवात पुरुष गटाच्या अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत स्वस्तिकने प्रथमच सहभागी झालेल्या पुण्याच्या सतेज संघ, बाणेर या संघाची कडवी झुंज 33-30 अशी मोडीत काढली.

मध्यंतराला स्वस्तिकने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर सतेजच्या मनोज बांद्रेने प्रत्येक चढाईत गुण घेत संघाला आघाडीवर नेले. सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना त्याने सामना 24-27 अशा गुणांवर आणला. सामन्याची शेवटची पाच मिनिटे अक्षरशः श्वास रोखायला लावणारी होती. शेवटची तीन मिनिटे असताना स्वस्तिकने सतेजच्या मनोज बांद्रेची अचूक पकड केली. तीच शेवटी निर्णायक ठरली. येथूनच पुढे सतेजची सामन्यावरील पकड सुटली आणि स्वस्तिकची सामन्यावरील विजयाची पकड अधिक घट्ट होत गेली. शेवटी स्वस्तिक क्रीडा मंडळाने 33-30 गुणांनी शानदार विजय मिळवला.

महिला गटातही मुंबई शहरच्याच डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब आणि शिवशक्ती महिला संघ यांच्यात जेतेपदाचा संघर्ष रंगला. डॉ. शिरोडकरने ही चुरशीची लढत अखेर 26-21 गुणांनी जिंकून विजेते पदाला गवसणी घातली. या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीला काहीसा सावध पवित्रा घेतल्यामुळे या संथ सामन्यात विश्रांतीला दोन्ही संघ 9-9 अशा बरोबरीत होते. मात्र त्यानंतर खेळात वेगाने आणि थराराने प्रवेश केला. पूजा यादवने तुफानी चढाया करत शिवशक्तीला आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडून शिरोडकरच्या कशिश पाटील, मेघ कदमने सातत्याने गुणांची कमाई करून संघाला विजयी ट्रकवर ठेवले. शेवटची तीन मिनिटे बाकी असताना शिरोडकरच्या दोघींनी पूजा यादवची पकड करत शिरोडकरचा विजय निश्चित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Weather update : महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज Weather update : महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. उष्णता चांगलीच जाणवत आहे....
आपल्याकडे सिनेमागृहांची कमतरता आहे… WAVES 2025 च्या मंचावर आमिर खान स्पष्टच बोलला
WAVES 2025 : शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन एकत्र येणार ? काय म्हणाले विजय देवरकोंडा ?
वजन कमी करण्यासाठी 6 6 6 वॉकिंग फॉर्म्युला नेमक आहे तरी काय? याबद्दल जाणून घ्या
दिवसभर उत्साही राहण्यासाठी असा करा परफेक्ट ब्रेकफास्ट
Mumbai News – अंधेरीत बेस्ट बसला दुचाकीची धडक, तरुण गंभीर जखमी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस